तरुण भारत

सराफ व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

301 ग्रॅम सोन्याचे दागिने परत न केल्याप्रकरणी एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

येथील एका सराफी व्यावसायिकाविरुद्ध बुधवारी खडेबाजार पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हिंदवाडी येथील आणखी एका सराफाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरविंद मुतकेकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

301 ग्रॅम सोन्याचे दागिने परत न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. याच सराफ व्यावसायिकाविरुद्ध 20 दिवसांपूर्वी सोने चोरीबरोबरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. उपलब्ध माहितीनुसार हिंदवाडी येथील एका सराफ व्यावसायिकाने अरविंद मुतकेकर यांना 301 ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करून दिले होते.

अरविंद हे मुतकेकर ज्वेलर्सचे भागिदार आहेत. अनिल मुतकेकर यांच्या निधनानंतर दिलेले दागिने किंवा त्याचे पैसे परत न केल्याचे संबंधित सराफाने पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात अरविंद यांच्यासह सहा जणांविरुद्ध 4 कोटी 3 लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची फिर्याद अनिल मुतकेकर यांची मुलगी संपदा अनिरुद्ध वैद्य (रा. ठाणे, मुंबई) यांनी दाखल केली होती. 20 दिवसांतील ही दुसरी फिर्याद असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

गोळीबाराच्या घटनेने बेळगावात खळबळ

Patil_p

बेकवाड शाळेतील शिक्षक बनविताहेत विद्यार्थ्यांसाठी मास्क

Patil_p

किणयेतील ‘तुकाराम बीज’ सप्ताहाची शताब्दीकडे वाटचाल

Amit Kulkarni

बुरुड समाजाला आर्थिक मदत द्या

Patil_p

पोलिसांकडून परवानगी घ्या; विवाह करा

Patil_p

नेक्स्टअस डान्स ऍकॅडमीला सुवर्णपदक

Patil_p
error: Content is protected !!