तरुण भारत

शहर परिसराला पावसाने झोडपले

शहरातील सखल भागाला तळ्य़ाचे स्वरुप

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

शहरात सकाळपासूनच कडक उन्ह पडले होते. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी पावणेचारच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली.जिल्हय़ातील अनेक भागात सकाळपासून अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या. शहरात मात्र सायंकाळी चारनंतर पावसाने झोडपले. सुमारे अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसाने शहरातील रस्त्यांना तळय़ाचे स्वरुप प्राफ्त झाले होते. अचानक आलेल्या पावसाने प्रवाशांसह फेरीवाल्यांची तारंबळ उडाली होती. नवरात्रोत्सव असल्याने शहरात खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची तारंबळ उडाली होती. शहरातील रस्ते खराब झाल्याने या रस्त्यांच्या खड्डय़ामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांची वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.

दिवसभर शहर परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरु होता. कडक उन्ह, ढगाळ वातावरणामुळे कमालीचे गरम होत होते. जिल्हय़ाच्या पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली होती. सध्या जिल्हय़ात काही ठिकाणी खरीप पिकांची काढणी सुरु असुन भात पिकाची सुगी सुरु आहे. मात्र एक दिवस आड पाऊस येत असल्याने पिक काढणीमध्ये व्यतय येत आहे.

Related Stories

माजी जि. प.अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक तरुण भारतचा विशेषांक

Abhijeet Shinde

विद्युत उच्चदाबामुळे करवीर तालुक्यात घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान

Abhijeet Shinde

पुरातत्वच्या कचाट्यात आता पंचगंगेचा घाट

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात दुसर्‍या दिवशी लसीकरण घेणार्‍यांच्या संख्येत वाढ

Abhijeet Shinde

शहापूर पोलीस ठाण्याच्या ग्रुपवर अश्लिल चित्रफिती व्हायरल

Abhijeet Shinde

गाव गाड्यातली खळ्यावरची मळणी कालबाह्य

Abhijeet Shinde
error: Content is protected !!