तरुण भारत

कोल्हापूर शहरात दुर्गामूर्तीचे उत्साहात स्वागत

पारंपरिक वाद्यांचा गजर : शहरात भक्तीमय वातावरण : साधेपणाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

 शहरात नवरात्रोत्सवाला मोठÎा उत्साहात प्रारंभ झाला. राज्यशासनाने नुकतेच सर्वच मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे.तसेच काही बंधने लादत शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्याने दुर्गाभक्तांतून समाधना व्यक्त होत आहे. शहरात सकाळपासूनत अनेक मंडळांनीत दुर्गामूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गामातेचे आगमन झाले.आणि कोल्हापूरच्या प्रसिद्ध शारदेय नवरात्रोत्सावाला प्रारंभ झाला. कोल्हापूर शहरातील अनके मंडळे सकाळपासूनच दुर्गामातेच्या स्वागताला सज्ज झाले होते. कुंभारवाडे मंडळांच्या कार्यकर्त्यामुळे गजबजून गेले होते.

 शाहुपुरी, गंगावेश, बापट कॅम्प परिसरातील कुंभारवाडे भक्तांनी दुर्गामूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर कडक उन्हामुळे दुर्गामूर्ती नेण्यासाठीची गर्दी ओसरली होती. सायंकाळी चारनंतरच मोठÎा प्रमाणात दुर्गाभक्तांनी दुर्गामूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. कोल्हापूरचा अंबाबाईचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.मात्र गेली दोन वर्षे कोरानामुळे दसरा उत्सव साधेपणाने करण्यात येत आहे. शिवाजी चौक, दसरा चौक,रंकाळावेश परिसरातील चौकातील या प्रमुख मंडळांनी आकर्षक मूर्ती उभारली होती. शहरातील बहुतांश सर्वच मंडळांनी सायंकाळी चारनंतर दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली. सायंकाळी चारच्या दरम्यान शहराला पावसाने झोडपले. पावसाच्या साथीने, पांरपरिक वाद्याच्या गजरात काही मंडळांनी वाजत गाजत दुर्गामूर्ती नेली. शहरातून मातेची मूर्तीत घेऊन जाण्यासाठी ग्रामीण भागातील मंडळांचे कार्यकर्ते विविध वाहनातून आले होते. दुर्गामूर्ती नेण्यासाठी तरुण मंडळाबरोबरच महिला मंडळेही सरसावली होती. जय मातादी, दुर्गामाता की जय, उदं ग आंबे उदे!  आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  मातेचा जयजयतकार करत ही मंडळी आपल्या गावी जात होते. गंगावेश,शाहुपुरीतील कुंभारवाडÎाताग्रामीण भागातील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नवरोत्रोत्सवासाठी कोल्हापूर शहर नटले असून काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

कोरोना नियमांचे पालन, साधेपणाने स्वागत

कोल्हपूरचा नवरात्रोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. गेले दोन वर्षे साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला गेला. यंदाही हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले आहेत. दुर्गामूर्तीच्या प्रतिष्ठापना करताना, दुर्गामूर्ती नेताना कोरोना नियमांचे पालन करत प्रशासनाला साथ दिली.अत्यंत साध्या पद्धतीने दुर्गामूर्तीचे स्वागत करण्यात आले. बहुतांश मंडळाने सायंकाळी चारनंतरच दुर्गामूर्ती नेण्यास प्राध्यान्य दिले. यावेळी पावसाने हजेरी लावल्याने तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली होती.

Related Stories

मराठा आरक्षण; गोकुळ दूध रोखण्याचा प्रयत्न: पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

Abhijeet Shinde

शिरोळ तालुक्यात कोणतेही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही – सकल मराठा समाज

Abhijeet Shinde

आठ ऑक्टोबरला पुन्हा महालसीकरण मोहिम

Abhijeet Shinde

पूरग्रस्त शेतकऱ्यांचे ५ रोजी जलसमाधी आंदोलन

Abhijeet Shinde

कबनूर ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करावी : शिवसेना

Abhijeet Shinde

कोल्हापुरात आणखीन चार कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!