तरुण भारत

कोल्हापूर शहर परिसराला पावसाने झोडपले

जोरदार पाऊस, शहरातील सखल भागाला तळ्याचे  स्वरुप

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

शहरात सकाळपासूनच कडक उन्ह पडले होते. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होवून सायंकाळच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या. शहरात मात्र सायंकाळी चारनंतर पावसाने झोडपले. सुमारे अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसाने शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. अचानक आलेल्या पावसाने प्रवाशांसह फेरीवाल्यांची तारंबळ उडाली होती.

नवरात्रोत्सव असल्याने शहरात खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची तारंबळ उडाली होती. शहरातील रस्ते खराब झाल्याने या रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांची वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.

दिवसभर शहर परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरु होता. कडक उन्ह,ढगाळ वातावरणामुळे कमालीचे गरम होत होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली होती. सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी खरीप पिकांची काढणी सुरु असुन भात पिकाची सुगी सुरु आहे. मात्र एक दिवस आड पाऊस येत असल्याने  पिक काढणीमध्ये व्यत्य येत आहे.

Related Stories

मत्स्यव्यवसाय परवान्यासाठी लाच स्विकारताना जलसंधारण अधिकारी जाळ्यात

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापने सुरु करण्यास परवानगी मिळावी

Abhijeet Shinde

होमगार्डसना मानधनाची प्रतीक्षा

Abhijeet Shinde

गोकुळ : पी.जी., डोंगळे, शिंपी यांचा पत्ता कट

Abhijeet Shinde

अजित पवार यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

Abhijeet Shinde

आशा, गटप्रवर्तकांची लवकरच मुंबईत बैठक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!