तरुण भारत

अनेक ग्राहकांचा कल आता क्रेडिट कार्डकडे

ऑगस्टमध्ये केला भरघोस खर्च : सणासुदीत क्रेडिट कार्डचा वापर वाढणार,  सुरक्षित मार्ग असल्याने लोकप्रिय

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

सणासुदीचा कालावधी सुरु होण्याच्या अगोदरच पेडिट कार्डच्या मदतीने होणारा खर्च वाढण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये ग्राहकांनी पेडिट कार्डच्या मदतीने जवळपास 77,981 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. ऑगस्ट 2020 च्या तुलनेत ऑगस्ट 2021 मध्ये 54 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जुलै 2021 मध्ये क्रेडिट कार्डच्या मदतीने ग्राहकांनी 75,119 कोटी रुपये खर्च केले आहेत. ऑगस्ट महिन्यात हा आकडा 4 टक्क्यांनी वधारला आहे. कोरोनाच्या कालावधीत क्रेडिट कार्डच्या आधारे होणाऱया या खर्चात सणासुदीत आणखीन तेजी प्राप्त होणार असल्याचे संकेत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून देण्यात आली आहे. कोरोनाच्या अगोदर फेबुवारी 2020 मध्ये पेडिट कार्डच्या मदतीने ग्राहकांनी 62,902 कोटी रुपयाची खरेदी केल्याची नोंद आहे. 

सध्या सणासुदीचा कालावधी सुरु झाला आहे. यामध्ये जास्तीत जास्त बँका, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या, होम अप्लायन्सेससह अन्य काही उत्पादनांवर विविध स्वरुपाच्या सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये कॅशबॅकसह पॉईंट रिवॉर्डपर्यंतचा समावेश आहे. बँकांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत क्रेडिट कार्डवर अधिकची खरेदी होणार असल्याची अपेक्षा आहे.

प्रमुख बँकांचा समावेश

एचडीएफसी : उपलब्ध आकडेवारीनुसार एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डमधून ऑगस्ट 2021 मध्ये एकूण 20,650 कोटी रुपयाची खरेदी करण्यात आली होती. बँकेकडे 1.47 कोटी ग्राहक संख्या आहे. स्टेट बँकेच्या पेडिट कार्डमधून 14,553 कोटी रुपयाची खरेदी करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय ः आयसीआयसीआय बँकेच्या पेडिट कार्डमधून 15,271 कोटी रुपयाची खरेदी ग्राहकांनी केली होती. जुलैमध्ये 14,355 कोटी रुपयाची खरेदी केली. यांच्याकडे जवळपास 1.14 कोटी ग्राहक असल्याची माहिती आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने खर्च करण्यासाठी ग्राहकांचा कल पुन्हा एकदा वाढला आहे.

नवीन कार्ड सादर ः एचडीएफसी बँकेने ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जवळपास 4 लाख नवीन पेडिट कार्ड सादर केली आहेत. तर बँकेने दिलेल्या माहितीनुसार प्रती महिना 5 लाख क्रेडिट कार्ड सादर करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. आयसीआयसीआय बँकेने चालू ऑगस्टमध्ये 2 लाख नवीन क्रेडिट कार्ड सादर केली आहेत. पेडिट कार्डच्या मदतीने होणाऱया खर्चाच्या संदर्भात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक हिलाही मागे टाकण्यात आयसीआयसीआयला यश आले आहे.

Related Stories

टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहन उद्योगात होणार वाढ

Amit Kulkarni

फ्लिपकार्टची अदानी ग्रुपसोबत भागीदारी

Patil_p

निर्यात क्षेत्रात परतले अच्छे दिन

Patil_p

भारतीय कंपन्यांचे पेटंटसाठी अर्ज सादर

Patil_p

लेनोवोचा टू-इन-वन लॅपटॉप बाजारात

Patil_p

दोनच महिन्यात 213 टक्के परतावा…

Amit Kulkarni
error: Content is protected !!