तरुण भारत

धडाकेबाज विजयासह केकेआर प्ले-ऑफच्या उंबरठय़ावर!

आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 86 धावांनी एकतर्फी मात, मुंबई इंडियन्सची आता फक्त चमत्कारावर भिस्त

शारजाह / वृत्तसंस्था

Advertisements

फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर एककलमी वर्चस्व गाजवणाऱया कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 86 धावांनी धुव्वा उडवला आणि यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्ले-ऑफमधील चौथे स्थान संपादन करण्यासाठी महत्त्वाकांक्षी झेप घेतली. केकेआरने 20 षटकात 4 बाद 171 धावा केल्या तर प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव सर्वबाद 85 धावांमध्येच खुर्दा झाला.

विजयासाठी 172 धावांचे आव्हान असताना राजस्थानची पहिल्या षटकापासूनच दाणादाण उडाली आणि सामन्याच्या कोणत्याही वळणावर ते अजिबात विजयाच्या ट्रकवर दिसून आले नाहीत. जैस्वालचा रिव्हर्स स्विपचा प्रयत्न फसल्यानंतर तो त्रिफळाचीत झाला आणि इथून सुरु झालेली राजस्थानची पडझड तेवातिया शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतरच थांबली. गोलंदाजीच्या आघाडीवर शिवम मावीने 21 धावात 4 तर फर्ग्युसनने 18 धावात 3 बळी घेतले. शकीब व वरुण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

शुभमनचे सलग दुसरे अर्धशतक

तत्पूर्वी, शुभमन गिलच्या सलग दुसऱया अर्धशतकामुळे केकेआरने या मैदानावर हंगामातील सर्वाधिक धावा नोंदवल्या. गिलने 44 चेंडूत 56 धावा व वेंकटेश अय्यरने 35 चेंडूत 38 धावा फटकावत फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला. या जोडीने 10.5 षटकात 79 धावांची धमाकेदार सलामी दिली.

राहुल त्रिपाठी (21), दिनेश कार्तिक (11 चेंडूत नाबाद 14), कर्णधार मॉर्गन (11 चेंडूत नाबाद 13) यांनीही शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी केली आणि यामुळे केकेआरला 170 धावांचा टप्पा सर करता आला. युवा डावखुरा पेसर चेतन साकरियाने राजस्थानतर्फे 23 धावात 1 बळी घेतला.

गिल व अय्यर यांनी आक्रमक फलंदाजीवर भर दिल्यानंतर केकेआरने 50 धावांचा टप्पा आठव्या षटकातच सर केला. अय्यरने आपल्या आक्रमक शैलीला फारशी मुरड न घालता प्रारंभी जयदीप उनादकटच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अय्यरच्या पॉवर-हिटिंगनंतर गिलने देखील तेवातियाला षटकारासाठी भिरकावून दिले. नंतर तेवातियाने अय्यरला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. राजस्थानच्या कर्णधाराने पुढे ग्लेन फिलीप्सला पाचारण केले. पण, त्याला 17 धावा मोजाव्या लागल्या. यादरम्यान त्याने नितीश राणाला बाद केले.

राहुल त्रिपाठी मुस्तफिजूरच्या डावातील 13 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर सॅमसनकडून जीवदान मिळाल्याने सुदैवी ठरला. या जीवदानाचा लाभ घेत त्याने शिवम दुबेच्या पुढील षटकात लागोपाठ चौकार फटकावले. दिनेश कार्तिक, मॉर्गन यांनी संघाला 170 चा आकडा पार करुन दिला.

धावफलक

केकेआर : शुभमन गिल झे. जैस्वाल, गो. मॉरिस 56 (44 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), वेंकटेश अय्यर त्रि. गो. तेवातिया 38 (35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), नितीश राणा झे. लिव्हिंगस्टोन, गो. फिलीप्स 12 (5 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), राहुल त्रिपाठी त्रि. गो. साकरिया 21 (14 चेंडूत 3 चौकार), दिनेश कार्तिक नाबाद 14 (11 चेंडूत 1 चौकार), इयॉन मॉर्गन नाबाद 13 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 17. (वाईड 5, लेगबाईज 3, वाईड 9). एकूण 20 षटकात 4 बाद 171.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-79 (वेंकटेश, 10.5), 2-92 (नितीश राणा, 11.5), 3-133 (शुभमन, 15.4), 4-145 (त्रिपाठी, 17.1).

गोलंदाजी : जयदेव उनादकट 4-0-35-0, ख्रिस मॉरिस 4-0-28-1, चेतन साकरिया 4-0-23-1, मुस्तफिजूर 4-0-31-0, शिवम दुबे 2-0-18-0, राहुल तेवातिया 1-0-11-1, ग्लेन फिलीप्स 1-0-17-1.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल त्रि. गो. शकीब 0 (3 चेंडू), लिव्हिंगस्टोन झे. त्रिपाठी, गो. फर्ग्युसन 6 (6 चेंडूत 1 चौकार), संजू सॅमसन झे. मॉर्गन, गो. मावी 1 (4 चेंडू), शिवम दुबे त्रि. गो. शिवम मावी 18 (20 चेंडूत 1 षटकार), अनुज रावत पायचीत गो. फर्ग्युसन 0 (1 चेंडू), ग्लेन फिलीप्स त्रि. गो. मावी 8 (12 चेंडूत 1 षटकार), राहुल तेवातिया त्रि. गो. मावी 44 (36 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), ख्रिस मॉरिस पायचीत वरुण 0 (2 चेंडू), जयदेव उनादकट झे. शकीब हसन, गो. फर्ग्युसन 6 (5 चेंडूत 1 चौकार), चेतन साकरिया धावचीत (शकीब-कार्तिक) 1 (5 चेंडू), मुस्तफिजूर नाबाद 0 (3 चेंडू). अवांतर 1. एकूण 16.1 षटकात सर्वबाद 85.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-0 (जैस्वाल, 0.3), 2-1 (सॅमसन, 1.1), 3-12 (लिव्हिंगस्टोन, 3.2), 4-13 (रावत, 3.4), 5-33 (फिलीप्स, 7.3), 6-34 (दुबे, 7.6), 7-35 (मॉरिस, 8.6), 8-62 (जयदेव, 11.2), 9-85 (साकरिया, 15.3), 10-85 (तेवातिया, 16.1).

गोलंदाजी : शकीब हसन 1-0-1-1, शिवम मावी 3.1-0-21-4, सुनील नरेन 4-0-30-0, लॉकी फर्ग्युसन 4-0-18-3, वरुण चक्रवर्ती 4-0-14-1.

171 धावांनी जिंकले तरच मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये!

केकेआरने राजस्थान रॉयल्सचा 86 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का ठरला असून आज शेवटच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादला 171 धावांनी हरवले तरच मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचता येईल, असे चित्र गुरुवारी स्पष्ट झाले. उदाहरणार्थ, मुंबईने प्रथम फलंदाजी करत 250 धावांचा टप्पा गाठला तर त्यांनी हैदराबादला 79 धावांपर्यंत रोखणे आवश्यक असेल.

सनरायजर्स प्रथम फलंदाजी करत असेल तर काय असेल समीकरण?

मुंबईने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांनी 171 धावांनी विजय मिळवणे आवश्यक असेल. मात्र, हैदराबाद प्रथम फलंदाजी करत असेल तर अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची अपेक्षाही करता येणार नाही, असे चित्र आहे. अर्थातच, आज रोहितसेनेला फक्त चमत्काराचीच अपेक्षा करावी लागणार आहे.

Related Stories

महिला आयपीएल लीगचीही घोषणा

Patil_p

स्टॉकहोम टेनिस स्पर्धेत टॉमी पॉल विजेता

Patil_p

बोरुसिया डॉर्टमंडचा एकतर्फी विजय

Patil_p

स्मिथविरुद्ध भारताच्या रणनीतीची आथरटनला उत्सुकता

Patil_p

भारताला विराटच्या गैरहजेरीचा फटका बसेल

Omkar B

भारतीय तिरंदाजांचा स्वित्झर्लंड दौरा रद्द,

Amit Kulkarni
error: Content is protected !!