तरुण भारत

साताऱ्यात टोळक्याकडून एकाचा दगडाने ठेचून खून

सातारा / प्रतिनिधी :

जमिनीचा व्यवहार व आर्थिक देवाण, घेवाणीच्या कारणातून शुक्रवारी 11 वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने संतोष उर्फ विठ्ठल सूळ या 45 वर्षीय इस्टेट एजंटचा खून केला. या घटनेमुळे दिव्यनगरीसह शाहूपुरीत परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेनंतर आरोपी फरारी झाले आहेत.

Advertisements

शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या संतोष सूळ रा. आवाडवाडी, आंबेदरे, ता. सातारा हे साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी दिव्यनगरी परिसरात त्यांचा एकाबरोबर जमीन व्यवहार व आर्थिक देवाण, घेवाणीतून वाद झाला. त्यावेळी सूळ यांनी त्याला तू दादा बनतो का? असे विचारले असता तू गाडीतून खाली उतर तुला दाखवतो असे म्हणत निकम नावाच्या युवकाने गाडीतून उतरल्यानंतर दांडके व दगडाने मारहाण सुरु केली. यावेळी आणखी काहीजण असल्याचेही समजते. दरम्यान, या घटनेत संतोष सूळ गंभीर जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना कळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर चार ते पाच फरारी आरोपींची नावेही समोर आली असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली आहेत.

Related Stories

जिल्हय़ात बाधित वाढी 50 खाली आल्याचा दिलासा

Patil_p

बुधवार, गुरुवार कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

datta jadhav

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 37.70 मि.मी. पाऊस

Abhijeet Shinde

कराडजवळ महामार्गावर बिबट्या अवतरला

datta jadhav

आईचा खून करुन मुलगा पोलीस ठाण्यात

datta jadhav

वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळकेला रौप्य

Abhijeet Shinde
error: Content is protected !!