तरुण भारत

भाजपा जिल्हा बँक स्वबळावर लढविणार

पृथ्वीराज देशमुख; कोअर कमिटीचा निर्णय; बिनविरोधचा प्रस्ताव नाही

सांगली/प्रतिनिधी

Advertisements

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच्या सर्व २१ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय कोअर कमिटी मध्ये झाला आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून माजी आमदार विलासराव जगताप व शिवाजीराव नाईक यांची निवड करण्यात आली आहे. इच्छुकांनी सोमवार पर्यन्त पक्षाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

देशमुख म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविण्यासंदर्भात भाजपा कोअर कमिटीची बैठक झाली. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार शिवजीराव नाईक, विलासराव जगताप, दिनकर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय सर्व नेत्यांनी एकमताने घेतला आहे.

त्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सर्वच्या सर्व २१ जागांवर भाजपाचे उमेदवार उभा केले जातील असे सांगत देशमुख म्हणाले, भाजपाची प्रत्येक तालुक्यात चांगली ताकद आहे. सर्व जागांचा अभ्यासही करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव सद्या तरी भाजपा कडे आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव आल्यास कोअर कमितीमध्ये निर्णय घेतला जाईल.

Related Stories

वाळवा तालुक्यात एका दिवसात १८ जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

राज्य मार्ग दुरुस्तीत पाईपलाईन फुटली, ग्रामस्थांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ

Abhijeet Shinde

अहंकार सोडा अन्यथा सांगली जिल्ह्यातील कारखाने आजारी पडतील: राजू शेट्टी

Abhijeet Shinde

मिरज जंक्शनच्या नामकरणासाठी शिवसेना खासदारांना साकडे

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचे अवघे दोन टक्के रूग्ण बेडवर

Abhijeet Shinde

सांगली : करगणी ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला 4 ऑक्सिजन मशीन, आरोग्य साधने प्रदान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!