तरुण भारत

गुजरी कॉर्नर, वसंत मेडिकलजवळ उभारणार तात्पुरता उड्डाणपूल


स्थानिक नागरिक, व्यापाऱयांच्या संतफ्त प्रतिक्रियेनंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय : आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून अंबाबाई मंदिर परिसरात पाहणी

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

नवरात्रोत्सवाच्या काळात अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते चुकीच्या पद्धतीने बंद केल्याने स्थानिक नागरिकांसह व्यापाऱयांतून संतफ्त प्रतिक्रिया उमठल्या होत्या. येण्याजाण्याची गैरसोय आणि व्यवसायावर परिणाम झाल्याने नागरिक आणि व्यापाऱयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने नियमात शिथिलता आणली आहे. भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी भाऊसिंगजीरोडवर गुजरी कॉर्नर (आझाद गल्ली ते गुजरी) आणि वसंत मेडिकल (राजाराम रोड ते जोतिबा रोड) येथे नवरात्रोत्सव काळात तात्पुरता उड्डाणपूल (स्कायवॉक) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश दिले.

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात होणारी भाविकांची गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भाऊसिंगजीरोडवर दर्शन रांगेचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी चौकात दर्शनाच्या ऑनलाईन पासची तपासणी, थर्मल स्कढनिंगनंतर भाविकांना दर्शन रांगेत प्रवेश दिला जातो. दर्शन रांग थेट भवानी मंडपाकडे जाते. दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेले बॅराकेटस्मुळे भेंडे गल्ली, महादेव गल्ली, कासार गल्ली, गुजरी, जोतिबा रोड आणि यांच्या समोर असणाऱ्या हुजूर गल्ली, आझाद गल्ली, राजाराम रोड येथे नागरिक, व्यापाऱयांचे ये-जा करणे बंद झाले आहे. दोन्हीबाजूच्या नागरिक, व्यापाऱ्यांना छत्रपती शिवाजी चौकात येऊन पुन्हा फिरून आपल्या गल्लीत जावे लागत आहे. या फटका नागरिकांसह व्यापाऱयांच्या व्यवसायावरही झाला आहे. त्यामुळे रस्ते किमान स्थानिक रहिवाशी आणि व्यापाऱयांसाठी खुले करा, भाविकांनाही खरेदीसाठी रस्त्यावर जाण्यास परवानगी द्या या मागणीने जोर धरला होता. स्थानिक मंडळांसह सराफ संघाच्या आवाहानानंतर गुरूवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची गुजरी, महाव्दार रोड परिसरात पाहणी केली होती.

आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली पाहणीदरम्यान, शुक्रवारी सकाळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी अंबाबाई मंदिर परिसरातील नागरिक, व्यापारी यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क केला. त्यांनीही तातडीने घटनास्थळी येत आमदार जाधव यांच्याबरोबर पाहणी केली. मनसेच्या परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी नागरिक, व्यापाऱयांच्या अडचणी, समस्या सांगितल्या. गर्दीचा ओघ पाहून पुढील निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट करत गुजरी कॉर्नर (आझाद गल्ली ते गुजरी) व वसंत मेडिकल (रमेश मेडिकल ते वसंत मेडिकल, राजारा रोड ते जोतिबा रोडला जोडणारा) या ठिकाणी तात्पुरता उड्डाणपूल तातडीने उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्यसह कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, शिवसेना माजी शहर प्रमुख तानाजी पाटील, मनसेचे संजय करजगार, शिवांजनी फौंडेशनचे सचिव अजित पवार, नेशन फर्स्टचे अवधून भाटे, अवधूत दळवी, विराज ओतारी, अमर झाड, बन्सी चिपडे, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, समीर नदाफ, अनिल पोतदार-हुपरीकर आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या आवाजाला आमदार जाधवांचे बळ
अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळातील सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या नियोजनातील चुकांबाबत नागरिक, व्यापाऱयांनी आवाज उठविल्यानंतर आमदार चंद्रकांत जाधव यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा घडवून आणल्याने नागरिकांच्या वतीने त्यांचे विजय करजगार यांनी आभार मानले.

पादचाऱ्यांच्या मार्ग सुकर
राजाराम रोड, जोतिबा रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोडवर पादचाऱयांना आता फिरता येणार आहे. परगावच्या भाविकांनाही खरेदीसाठी या ठिकाणी जाता येणार आहे. तात्पुरत्या उड्डाणपुलामुळे दर्शनरांगेवरून भाऊसिंगजीरोड क्रॉस करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱयांतूनही समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

कोल्हापूर : विजेंच्या तारांवर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा खंडित

Abhijeet Shinde

महाविद्यालयीन युवतींना रेस्क्यू फॉर्सचे प्रशिक्षण

Abhijeet Shinde

कोरोनाबाधित पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा

Abhijeet Shinde

राज्य शासनाने चांदी उद्योग चालू करण्यास सवलत द्यावी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पुरस्कार

Abhijeet Shinde

किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!