तरुण भारत

पालिका पाणी पुरवठयाचे काम आदर्शवत

विकास कामांचे खासदार उदयनराजेंच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा नगरपालिकेतील सर्वच विभाग अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत मात्र त्यामध्ये पाणी पुरवठा विभागाचे काम हे आदर्शवत ठरले आहे. शहरातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन कसे करावे याचा उत्तम आदर्श या विभागच्या सभापती सौ सीता राम हादगे यांनी घालून दिला आहे. एक महिला असूनही पालिकेचा अत्यंत महत्त्वाचा विभाग जबाबदारीने हाताळण्यात त्यांना यश आले आहे, असे गौरवोद्गार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.

पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांच्या प्रभाग क्र. 1 मधील हुतात्मा स्मारक येथील श्री. छ. धर्मवीर संभाजी महाराज ओपन जिम, बहुउद्देशीय छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तसेच बडेकर वस्ती अंतर्गत कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामासह आधी विविध विकास कामांचा शुभारंभ खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद ऍड. डी. जी.  बनकर, पाणीपुरवठा सभापती सौ. सीता हादगे, नगरसेवक राजू भोसले, श्रीकांत आंबेकर बाळासाहेब ढेकणे, सौ. लता पवार, विजय बडेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे निवृत्त कार्यकारी अभियंता घाडगे साहेब  स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे विजयकुमार देशपांडे, ज्येष्ठ मार्गदर्शक काका किर्दत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्वच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सातारा विकास आघाडीने सातत्याने केला आहे. नगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा विभाग हा अत्यंत संवेदनशील समजला जातो. हा विभाग थेट नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संलग्न आहे. आपल्या घरी एखाद्या दिवस पाणी आली नाही तर त्याचा किती त्रास होतो, याची सर्वांना कल्पना आहे.   थोडक्यात सात दिवस आणि 24 तास डोळ्यात तेल घालून सतत सतर्क राहून या विभागात काम करावे लागते. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेचा सभेमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या सभापती सीता हादगे यांनी या विभागासाठी अत्यंत दूरदर्शीपणा दाखवत मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेतला. त्यांची ही तळमळ पाहता असाच नगरसेवक हवा, असे प्रत्येक नागरिकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. पाणीपुरवठा विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी केवळ या विभागात बदल न करता हा विभाग सक्षम केलाच शिवाय आपल्या प्रभागातील विकास कामांवर लक्ष केंद्रित केले. केवळ आश्वासने न देता दिलेल्या शब्दांची परतफेड करण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे हा आजच्या विविध विकास कामांचा शुभारंभावरुन स्पष्ट होतो, अशी पुस्तीही उदयनराजे भोसले यांनी यावेळी जोडली. सौ. सीता हादगे यावेळी म्हणाल्या, पाणीपुरवठा विभागात काम करताना आमचे नेते उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे पक्षप्रतोद डी जी बनकर साहेब सहकारी नगरसेवक राजू भोसले यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य खूप मोलाचे ठरले. प्रभाग क्र. 1 मध्ये नगरसेविका म्हणून काम करीत असताना गेल्या साडेचार वर्षात सतत मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधत विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा विभागाचे सभापती म्हणून काम करीत असताना हे पद किती जबाबदारीचे आहे, याची जाणीव झाली. सभापती म्हणून काम करताना सातायातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधण्याचा योग लाभला. आमचे नेते उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने यापुढेही आपल्याला अशाच प्रकारची विकास कामे करण्याची संधी मिळावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यावेळी शकील मुजावर, बापू ओतारी, राज कदम, पंकज पवार, रवि साठे, अजय साळुंखे, शकील सय्यद, पिंटू शेठ जाधव, विशाल जगदाळे, संतोष शेडगे, संदेश भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. विकासकामांच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केल्यामुळे राम हादगे यांचे उदयनराजे भोसले यांनी अभिनंदन केले.

Related Stories

राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 31922 क्युसेक विसर्ग,102 बंधारे पाण्याखाली

Abhijeet Shinde

साताऱयात दत्त जयंती रक्तदानाने साजरी

Patil_p

बोगस बियाणे विक्रीबाबत शासन कठोर पावले उचलणार- डॉ. विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कोरोनाचा टक्का वाढला; सक्रीय रुग्णसंख्या 3 लाख 36 हजारांवर

Abhijeet Shinde

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन : विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Abhijeet Shinde

जिल्हा रुग्णालयातील आरटी-पीसीआर यंत्रणा बंद

Patil_p
error: Content is protected !!