तरुण भारत

खेड नगर परिषद डिझेल घोटाळा, फौजदारी गुन्हा दाखल होणार!

प्रतिनिधी/ खेड

खेड नगर परिषदेत 23 लाख 92 हजार 750 रूपयांचा इंधन व अन्य गैरव्यवहार केल्याचे चौकशी अहवालात दिसून आल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी दिले. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱयांनी गुन्हा दाखल करून अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.

Advertisements

खेड नगर परिषदेमध्ये डिझेलसह अन्य कामांत घोटाळा केल्याच्या तक्रारी सेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेना नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केल्या होत्या. या संदर्भात जिल्हाधिकाऱयांनी चौकशी करुन अहवाल शासनाला सादर केला. दाखल झालेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याचे चौकशीत दिसून आले.

 27 ऑगस्ट रोजी शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार नगर परिषदेच्या खर्चातून खासगी वाहनामध्ये मर्यादेपेक्षा जास्त इंधन पुरवठा करून घेण्यात आला होता. नगर परिषदेच्या खर्चातूनच नंबर नसलेल्या खासगी वाहनांमध्येही इंधन पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

नगर परिषदेच्या खर्चातूनच नगर परिषद कार्यालयाच्या नावाने इंधन पुरवठा करण्यात आला असून कॅनमध्येही इंधन भरून इंधन पुरवठा केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंधन भरतेवेळी संबंधित वाहनांचे लॉगबुक ठेवणे, त्यात इंधन, वाहनाने धावलेले अंतर, प्रयोजन नमूद करणे आवश्यक असतानाही तसे करण्यात आलेले नाही. या बाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लॉगबुक गहाळ केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला असून तपासणी करून वस्तूस्थिती असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तत्काळ करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

 प्राप्त अहवालानुसार 23 लाख 92 हजार 750 रूपये इतक्या रक्कमेचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालात दिसून आले. या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱयांवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पेट्रोल पंपावर स्लिप देण्यापासून इंधनाच्या रक्कमा प्रदान होईपर्यंतच्या प्रक्रियेतील प्रत्येकाचे नाव व पदनाम, अनियमितता सविस्तरपणे नमूद करून शासनाला तातडीने कळवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.

Related Stories

खेड पोलिसांच्या सतर्कतेने चोरीस गेलेला मोबाईल मिळाला परत

Abhijeet Shinde

कळझोंडीत पुलाचा खांब कोसळला, घरालाहे तडे

Patil_p

आवळीचे भरडमधील ग्रामस्थ नळपाणी योजनेपासून वंचित

Ganeshprasad Gogate

लॉकडाऊन 8 जुलैपर्यंतच, मुदतवाढ नाही – जिल्हाधिकारी

NIKHIL_N

तक्रारीची चौकशी तीन वर्षांनंतरही पुढे सरकेना

NIKHIL_N

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना दहा लाखापर्यंत विना निविदा काम द्या

NIKHIL_N
error: Content is protected !!