तरुण भारत

हैदराबादमध्ये पावसाचा कहर

घर-रेस्टॉरंटमध्ये शिरले पाणी- रस्त्यांवर वाहू लागली वाहने

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisements

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी साचले असून दोन जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरु असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. पावसामुळे अनेक नागरी भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे.

घर आणि रेस्टॉरंटमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात तरंगताना दिसून आली आहेत. पावसामुळे वनस्थळीपुरम, मलकपेट, दिलसुखनगर, चैतन्यपुरी, सरुर नगर, बंजारा हिल्स, ज्युबली हिल्स, पंजागुट्टा आणि खैरताबाद या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ता ओलांडणे देखील लोकांना अवघड ठरले आहे.

विमानोड्डाणांच्या मार्गात बदल

सखल भागात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक  दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. खराब हवामानामुळे हैदराबाद विमानतळावरील 8 उड्डाणांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पुढील 24 तासांदरम्यान हैदराबादसह तेलंगणाच्या काही जिल्हय़ांमध्ये मध्यम  स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अनुमान हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुसळधार पावसानंतर आपत्ती व्यवस्थापन संचालकाने शहरासाठी इशारा जारी केला आहे.

Related Stories

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावरुन पक्षात फूट?; सोनिया गांधी घेणार निर्णय

Abhijeet Shinde

रविवारी दिवसा कर्फ्यु नाही – राज्य सरकारचा निर्णय

Rohan_P

4 वर्षांत 168 आमदार-खासदारांचे पक्षांतर

Patil_p

निर्भया : दोषींचे वकील पुन्हा कोर्टात

prashant_c

जिल्हय़ात आणखी चौघांचा मृत्यू

Patil_p

जन्मदिनीच आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!