तरुण भारत

उचगाव येथील ट्रक्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण आज

उचगाव

उचगाव येथील शेतकरी संघटना आयोजित ट्रक्टर ट्रॉली रिव्हर्स व ट्रक्टर राऊंड स्पर्धेचे शानदार उद्घाटन येथील तळोली माळावर हॉटेल रॉयलच्या पाठीमागे करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत माजी अध्यक्ष संभाजी कदम होते.

Advertisements

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन गणेश दूध संकलन केंद्राचे मालक प्रवीण देसाई व सुधाकर करटे यांच्या हस्ते करण्यात आले. रॉयल हॉटेलचे मालक किरण पावशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. तर दीपप्रज्वलन उचगाव ग्राम पंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्या योगिता देसाई, सदस्य एल. डी. चौगुले, यादो कांबळे, मोनाप्पा पाटील, बंटी पावशे, उमेश बुवा, स्मिता खांडेकर, रुपाली गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. शर्यतीचे उद्घाटन बाळकृष्ण तेरसे, प्रवीण देसाई, पुंडलिक पावशे यांच्या हस्ते करण्यात आले.

शर्यत उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून विमा प्रतिनिधी अशोक चौगुले, यल्लाप्पा पावशे, मंगेश हुक्केरीकर, चंद्रकांत कृष्णाजी कदम-पाटील, सदस्य मोना पाटील, ग्राम पंचायत माजी सदस्य सुनील देसाई, अंकुश पाटील, युवराज मुतकेकर, बाळू जाधव, साई पावशे, समर्थ चौगुले, विजय खटावकर, योगेश गिरी, लक्ष्मण पावशे उपस्थित होते.

यावेळी बाळू पावशे, गोपाळ पावशे, दत्ता चौगुले, ब्रह्मानंद पाटील, किसन पावशे, कल्लाप्पा पाटील, परशुराम पावशे, सचिन खांडेकर, उमेश खांडेकर, दिनकर पावशे, अतुल पावशे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार भगवे फेटे व पुष्पहार घालून करण्यात आला. सूत्रसंचालन, स्वागत व आभार मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी केले.

आज बक्षीस समारंभ

या ट्रक्टर स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला असून शर्यतीचा सांगता समारंभ रविवारी संध्याकाळी होणार आहे. तरी स्पर्धकांनी रविवारी सकाळी लवकर उपस्थित रहावे, असे शेतकरी संघटनेने कळविले आहे.

Related Stories

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीची सुरू असलेली कामे तातडीने करा

Amit Kulkarni

महिला आघाडीतर्फे फराळाचे पदार्थ विक्री शुभारंभ

Amit Kulkarni

अरगन तलावनजीक नियमबाहय़ वाहनधारकांवर पोलीसांची कारवाई

Patil_p

‘त्या’ मांत्रिकाने लाटली होती 6 कोटींची मालमत्ता!

Rohan_P

आशा कार्यकर्त्यांना किमान 12 हजार वेतन द्या

Patil_p
error: Content is protected !!