तरुण भारत

NIA ची 16 ठिकाणी छापेमारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी 16 ठिकाणी छापे टाकले. व्हॉईस ऑफ हिंद मासिकाशी संबंधित प्रकरणांमध्ये ही कारवाई होत असून, अधिकाऱ्यांनी टीआरएफ (द रेझिस्टन्स प्रंट) कमांडर सज्जाद गुल यांच्या घरावरही छापा टाकल्याचेही सांगण्यात येते.

Advertisements

जम्मू-काश्मीरमध्ये ‘व्हॉइस ऑफ हिंद’ मासिक तरुणांना चिथावणी देणे आणि कट्टरतावादी करण्यासाठी प्रयत्न करते. तसेच आयईडीच्या पुनर्प्राप्तीसंदर्भात कुलगाम, बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनाग येथे 16 ठिकाणी कारवाई सुरू आहे. गुलाम मोहम्मद टाक, गुलाम मोहिउद्दीन अहँगर, मंजूर अहमद मीर आणि मोहम्मद हुसेन खान या पाच जणांना अचबल पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

काश्मीर खोऱ्यातील छाप्यांमध्ये 500 हून अधिक संशयित पकडले

काश्मीर खोऱ्यात महिनाभरातील हत्या लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 500 हून अधिक तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांमध्ये दगडफेक करणारे, ओजीडब्ल्यूच्या संशयित यादीतील तरुण आणि जमात-ए-इस्लामी आणि तेहरीक-ए-हुर्रियतशी संबंधित संवर्ग यांचा समावेश आहे. केंद्रातून पाठविलेले आयबीचे अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Related Stories

सर्व काही लाल अन् पांढऱया रंगाचे

Patil_p

अर्थव्यवस्थेचा समतोल साधण्याची कसरत

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 3,848 नवे बाधित; 4,466 जणांना डिस्चार्ज !

Rohan_P

उत्तरप्रदेशात 40 टक्के महिलांना उमेदवारी; प्रियंका गांधींची घोषणा

datta jadhav

पंतप्रधान मोदींनी आज बोलावली महत्त्वाची बैठक ; गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री राहणार उपस्थित

triratna

मध्यप्रदेश : खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप

datta jadhav
error: Content is protected !!