तरुण भारत

बसुर्ते, कोनेवाडीत स्वच्छता सप्ताह अभियान

वार्ताहर /उचगाव

उचगाव ग्रामपंचायतीच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता सप्ताह अभियान हाती घेण्यात आले. उचगाव ग्रा.पं. कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या कोनेवाडी, बसुर्ते गावांमध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बसुर्ते येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये स्वच्छता अभियानचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisements

ग्राम विकास अधिकारी वासू दत्त व उचगाव ग्रा.पं. अध्यक्ष जावेद जमादार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पुंडलिक मोरे,. ग्रा. पं. माजी सदस्य दीपक गडकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बसुर्ते गावात व प्राथमिक शाळेत स्वच्छता करण्यात आली. प्राथमिक शाळेच्यावतीने सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रा.पं. सदस्यांनी स्वच्छता अभियान उपक्रम हाती घेतल्यामुळे त्यांचे आम्ही अभिनंदन करत आहोत, यापुढेही त्यांनी असेच नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत. ग्रा. पं. क्षेत्रातील उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी ही गावे आदर्श गावे असल्याचे मुख्याध्यापिकांनी सांगितले.

कोनेवाडी येथे स्वच्छता मोहीम कोनेवाडी येथेसुद्धा ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कोनेवाडी गावातील गल्ल्यांची व प्राथमिक शाळेतील पटांगणाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी कोनेवाडी गावचे सदस्य मोनापा पाटील यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष मथुरा तेरसे, एल. डी. चौगुले, यादो कांबळे, बंटी पावशे, बाळकृष्ण तेरसे, दत्ता बेनके, सूरज सुतार, गजानन नाईक, शशी जाधव, मारुती खांडेकर, रूपाली गिरी, स्मिता खांडेकर, रूपा गोंधळी, लक्ष्मी कुराडे, अर्मिण बंकापुरे, अनुसया कोलकर, माधुरी पाटील, हनुमंत बुवा, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

चिकोडी येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा

Omkar B

ठळकवाडी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Amit Kulkarni

पाणी कपाती ऐवजी नव्या स्तोस्त्रचा तांचा शोध घेणे आवश्यक

Patil_p

चार दिवसांमध्ये कोरोनाचे 118 नवे रुग्ण

Patil_p

दागिन्यांसह भरभक्कम तिजोरीही पळविली!

Amit Kulkarni

निपाणीत पत्रकार अशोक याळगी यांना श्रद्धांजली

Patil_p
error: Content is protected !!