तरुण भारत

कडोली-अलतगा-आंबेवाडी संपर्क रस्ता खराब

कडोली-अलतगा-आंबेवाडी संपर्क रस्ता खराब

वार्ताहर /कडोली

Advertisements

कडोली ते आंबेवाडी संपर्क रस्ता अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. नुकत्याच झालेल्या पावसात हा रस्ता पूर्णतः वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना धोक्मयाचे बनत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रा.पं.ने याकडे दुर्लक्ष करून अनेकांच्या जीवाशीच खेळण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, अलतगा-आंबेवाडी रस्ताही खराब झाला असून खडीमशीन चालकांच्या वाहनांमुळे हा रस्ता खराब होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी होत आहे.

कडोली-आंबेवाडी आणि कडोली-अलतगा-आंबेवाडी असे दोन्ही रस्ते खराब झाले आहेत. कडोली-आंबेवाडी रस्ता सात-आठ वर्षांपूर्वी करण्यात आला होता. मात्र, कडोलीपासून केवळ अर्धा कि. मी. रस्त्याचे काम अर्धवट टाकण्यात आले. हा रस्ता करावा यासाठी अनेकांनी ग्रा. पं. व संबंधित बांधकाम खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र याकडे कानाडोळा केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी केलेला रस्ताही खराब झाला असून आता संपूर्ण रस्ता नव्याने करावा, अशी मागणी होत आहे.

या रस्त्यावरून खडीमशीन चालक व मालकांची अवजड वाहने जात असल्याने हे रस्ते खराब होत आहेत. परिणामी चिरीमिरीसाठी अधिकाऱयांनी डोळय़ावर पट्टी बांधून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच आलेल्या पुरामुळे रस्त्यावर भगदाड पडली आहेत. येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. पावसाळय़ात तर हा रस्ता बंद होता. पुरात चार दिवस घरातच कोंडून बसावे लागले. वाहने इतर मार्गावरून न्यावी लागत होती. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केले.

सात-आठ वर्षांपासून हा रस्ता अर्धवट ठेवल्याने केलेला रस्ताही खराब झाला आहे. त्यामुळे कडोली-आंबेवाडी आणि कडोली-अलतगा संपर्क रस्ता असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे. तेव्हा याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

अंगणवाडी कार्यकर्त्यांचा अपमान टाळा

Amit Kulkarni

मंगाई मंदीर परिसरात ड्रेनेजचे पाणी

Patil_p

युवा नेते जितेश खोत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Omkar B

म्हैशाळजवळ सव्वा क्विंटल गांजा जप्त

Patil_p

हिंडाल्कोजवळ बस चालकाला मारहाण

Patil_p

सी. बी. कोरे साखर कारखान्यात कोरोना लसीकरण

Omkar B
error: Content is protected !!