तरुण भारत

उचगाव प्राथमिक मराठी शाळेत स्मार्टरुमचे उद्घाटन

वार्ताहर /उचगाव

विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षणाचा उपयोग व माहिती व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये स्मार्ट क्लास ही योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचा तसेच आधुनिक पद्धतीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेच्या स्मार्टरूमच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Advertisements

अध्यक्षस्थानी उचगाव ग्रा.पं. अध्यक्ष जावेद जमादार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण क्षेत्र शिक्षणाधिकारी जुट्टण्णावर, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उचगाव प्राथमिक मराठी शाळेमध्ये नवीन बांधण्यात आलेल्या स्मार्ट क्लासरूमचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी यावेळी ज्ञानसुधा इन्व्हेंशन सोल्युशन बेळगाव यांच्यावतीने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी स्मार्ट क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटरचे ज्ञान व्हावे, यासाठी या क्लासरूममध्ये कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, युपीएस आदी उपकरणांचा उपयोग करण्यात आलेला आहे. या क्लासरूममध्ये वीस मुले बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. उचगाव ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच ही योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षणाचे ज्ञान लहानपणीच मिळणार आहे. यावेळी उचगाव ग्रामपंचायतीच्यावतीने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे तसेच हर्षा शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर चन्नराज हट्टीहोळी यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने त्यांचे शाल, श्रीफळ देऊन कमिटीचे अध्यक्ष मनोहर पावशे व सर्व सदस्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य एल. डी. चौगुले यांनी आभार मानले.

Related Stories

जांबोटी-कणकुंबी-चोर्ला मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य

Patil_p

अनगोळ येथील गाळय़ांसाठी आज होणार लिलाव

Omkar B

अयोध्यानगर येथे कचराकुंडी नसल्याने परिसर अस्वच्छ

Amit Kulkarni

निपाणीत ‘नागरिकत्व’ विरोधात एकजूट

Patil_p

गोवा-कर्नाटक सीमेवर चार वाघांच्या मृत्यूने खळबळ

Abhijeet Shinde

गणाचारी गल्ली येथील युवकाची आत्महत्या

Rohan_P
error: Content is protected !!