तरुण भारत

जिल्ह्याला मोठा दिलासा : 75 नवीन बाधित

अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 11 ऑक्टो. 2021, स. 11.00

● सलग तिसऱ्या दिवशी नीचांकी वाढ ● बाधित वाढीचा आलेख शंभरच्या खाली ● रविवारी रात्री अहवालात 75 बाधित  ● एकूण 3,751 जणांची तपासणी  

Advertisements

सातारा / प्रतिनिधी : 

जिल्ह्यात बाधित वाढीने अडीच लाखांचा टप्पा पार केला असला तरी जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचे प्रमाण 98 टक्के एवढे चांगले असून गेल्या तीन दिवसापासून बाधित वाढीचा वेग मंदावला असून, रविवारी अहवालात देखील गत सहा महिन्यातली नीचांकी बाधित वाढ नोंद झालेली आहे. गणेश उत्सव पासून बाधित वाढ मंदावत गेली आणि नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे सुरू असलेली वाटचाल जिल्हावासीयांना मोठा दिलासा देऊ लागलेली आहे.

रविवारी अहवालात 75 नवीन बाधित 

गत चार पाच महिन्यात दर रविवारी बाधित वाढीचा आलेख खाली घसरत असल्याचा अनुभव आहे. या वेळीही तो आला. मात्र यावेळी गत सहा महिन्यांतील नीचांकी बाधित वाढीची नोंद घेऊन हा अहवाल आला असून एकूण तीन हजार 751 जणांची तपासणी केल्यानंतर फक्त 75 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामुळे जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी दराचा आलेखही खाली घसरला असून तो दोन टक्के वर आहे.

हॉटस्पॉट तालुकेही सावरले

ऑक्टोबर महिना आणि त्यातील नवरात्र उत्सवाचे मंगलमय दिवस जिल्हय़ासाठी दिलासादायक ठरत असून, गेल्या दोन दिवसात बाधित वाढ दीडशेच्या खाली राहिली होता. सेक्सी रविवारच्या अहवालात बागेत वाढीचा आलेख शंभरच्या खाली गेल्याने फक्त 75 नवीन बाधित  समोर आले आहेत. निच्चांकी बाधित वाढीमुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल असा आशावाद पल्लवित झाला असून जिल्हावासिम दुर्गामातेच्या चरणी हीच प्रार्थना करत आहेत की देवी या कोरोनाच्या संकटातून या जगाची लवकर मुक्त कर. सद्यस्थितीत बाधित वाढीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावल्याने हॉटस्पॉट ठरलेले सातारा, फलटण, खटाव, माण, कराड, कोरेगाव हे तालुके चांगले सावरले असून खंडाळा, महाबळेश्वर, जावली, पाटण, वाई  तालुके कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असून महाबळेश्वर तालुका कोरोना मुक्त झाल्याचा मोठा दिलासा सध्या लाभत आहे.

रविवारपर्यंत जिल्हय़ात  एकूण नमुने 21,47,029,  एकूण बाधित 2,50,093,  एकूण कोरोनामुक्त 2,41,018,  मृत्यू 6,352, उपचारार्थ रुग्ण 6,386  
रविवारी जिल्हय़ात बाधित 112, मुक्त 22, मृत्यू 05  

Related Stories

पदवीधर मतदार संघात विजय निश्चित : संग्रामसिंह देशमुख

Abhijeet Shinde

वाईत घरफोडी करणारी टोळी सीसीटीव्हीत कैद

datta jadhav

सातारा : पाणी पुरवठा सभापती ऑन फिल्ड

datta jadhav

साताऱयात कंटेन्मेंट झोनवर पोलीस बंदोबस्त

Patil_p

माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

Abhijeet Shinde

डब्लूएमओच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Omkar B
error: Content is protected !!