तरुण भारत

अशिक्षित लोक म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शाह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने एका वृत्तवाहीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असुन अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं आहेत, असं वक्तव्य त्यांनी या मुलाखतीदरम्यान केलं आहे. उत्तर प्रदेश येथील भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर घातलेल्या हल्यामध्ये ९ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गेले काही दिवस राजकिय विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिकांत संतापाची लाट आहे.

यातच गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने यावरुन ही पुन्हा सामान्य माणुस कसा प्रतिक्रीया देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद टीव्हीतर्फे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक तर केलंच आहे.

रविवारी दि. १० अक्टोबर रोजी झालेल्या या मुलाखतीत अमित शाह यांनी अशिक्षित लोकांना देशावरचं ओझं असं संबोधलं असून ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत, असं विधानही केलं आहे. या मुलाखतीत बोलताना शाह म्हणाले, एक अशिक्षित व्यक्ती देशावरचं मोठं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल ? त्यामुळे देशातील सामान्य माणुस यावर काय प्रतिक्रीया देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisements

Related Stories

कराडमध्ये टेस्टींग वाढवण्याच्या सूचना

Patil_p

खालच्या पातळीचं राजकारण ठाकरे-पवारच करु शकतात – किरीट सोमय्या

Abhijeet Shinde

गुजरातमधील राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

कर्नाटकः मुख्यमंत्री बोम्माई आज पंतप्रधान मोदींना भेटणार

Abhijeet Shinde

दिल्ली विद्यापीठ : 2 ऑगस्टपासून सुरु होणार प्रवेश प्रक्रिया

Rohan_P

हातकणंगलेत लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!