तरुण भारत

महाराष्ट्र बंद : सांगलीत बंदला संमिश्र प्रतिसाद

प्रतिनिधी / सांगली

लखीमपूर येथे घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सोमवारी सांगलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. स्टेशन चौकापासून रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपमहापौर उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, शंभूराज काटकर, राहुल पवार, ज्योती आदाटे यांच्यासह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. बंद वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Advertisements

Related Stories

जिल्ह्याच्या ४४३ कोटींच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी

Abhijeet Shinde

‘आविष्कार’चा शनिवारी 18 वा संगीत महोत्सव

Abhijeet Shinde

इस्लामचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची अशी ही जयंती

Abhijeet Shinde

वारणा धरणात १२.५७ टी.एम.सी. पाणीसाठा

Abhijeet Shinde

खाडे, दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी

Abhijeet Shinde

सांगली फाटा टोलनाक्यानजिक झालेल्या अपघातात दोन ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!