तरुण भारत

शाओमीने विकले 20 लाख स्मार्ट फोन्स

फेस्टीव्ह सेलमध्ये कंपनीची चमक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी शाओमीने फेस्टीव्ह सेल अंतर्गत पाच दिवसातच विविध माध्यमातून 20 लाखापेक्षा अधिक स्मार्टफोन्स विक्री करण्याचा विक्रम साध्य केला आहे.

प्रिमियम गटामध्ये शाओमी 11 लाईट एनई 5 जी व एमआय 11 एक्स सिरीजच्या फोन्सना ग्राहकांनी सर्वाधिक मागणी नोंदली होती, असेही शाओमीने म्हटले आहे. यानंतर रेडमी नोट 10 एस आणि रेडमी नोट 10 प्रो तसेच रेडमी 9 सिरीज अंतर्गत मध्यम गटातील स्मार्ट फोन्सना बऱयापैकी मागणी राहिली होती. शाओमीने अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये दर्जेदार फोन्समुळे आपला वाटा अधिक वाढवला असल्याचे दिसले आहे.

टीव्हीविक्रीत दमदार कामगिरी

एवढेच नव्हेतर कंपनीने तीन दिवसांच्या फेस्टीव्ह सेल अंतर्गत जवळपास 1 लाख टीव्ही विक्री करण्याचाही विक्रम करून दाखविला आहे. उत्पादनांची उत्कृष्ट मालिका सादर करून टीव्ही विक्रीमध्येही शाओमीने आपले स्थान अधिक बळकट केले आहे. कंपनीच्या फोर के टीव्हीला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

Related Stories

टेंडाकडून ‘पॉकेट मोबाईल वायफाय’ उपकरण सादर

Patil_p

ऍपलचे पहिले ओएलइडी आयपॅड 2023 ला येणार

Patil_p

‘एअरपॉड मॅक्स’चे ऍपलकडून लाँचिंग

Omkar B

लावाचा स्मार्टफोन बाजारात

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी झेड फ्लिप फोल्डेबल फोन ऑगस्टमध्ये

Patil_p

ओप्पोचा रेनो 6 सिरीजचा फोन लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!