तरुण भारत

विक्रमी स्तरावर पोहचून बाजार किंचित तेजीसह बंद

सेन्सेक्समध्ये 76 अंकांची तेजी, टाटा मोटर्स सर्वाधिक नफ्यात

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisements

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी निफ्टी निर्देशांकाने नवा इतिहास रचला. निफ्टी पहिल्यांदाच 18 हजारावर पोहचला होता. सुरूवातीला घेतलेली आघाडी सरतेशेवटी टिकवण्यात शेअर बाजाराला अपयश आलं. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक तेजीसह बंद झाले.

सोमवारी सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 76 अंकांच्या वाढीसह 60,135.78 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 50 अंकांच्या वधारासह 17,945.95 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स सुरूवातीच्या सत्रामध्ये जवळपास 350 अंक वर चढला होता. निफ्टीत मात्र एकावेळी 100 अंकांची घसरण अनुभवायला मिळाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग हे तेजीसह बंद झाले तर 10 घसरणीसह बंद झाले. मारूती, पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग सर्वाधिक 3 टक्के आणि आयटीसी, एनटीपीसीचे समभाग 2 टक्के तेजीसह बंद झाले. टीसीएसचे समभाग मात्र सर्वाधिक 6 टक्के इतके नुकसानीत होते. ऑटो, धातू आणि रियल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी बाजाराला आधार दिल्याचे पहायला मिळाले. एनएसईवर ऑटो निर्देशांक 2.67 टक्के, रियल्टी निर्देशांक 1.73 टक्के आणि धातू निर्देशांक 1.50 टक्के वाढीसह बंद झाल्याचे दिसले. सोमवारी मात्र आयटी समभागांमध्ये दबाव होता. आयटी निर्देशांक 3.36 टक्के घसरणीसह बंद झाला. निफ्टीत टाटा मोटर्सने 9 टक्के वाढीसह नफ्यात राहण्याचा मान मिळवला होता.

बीएसईवर 3 हजार 592 समभागांमध्ये व्यवहार झाला, ज्यात 1 हजार 952 समभाग तेजीसह बंद झाले. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य 267 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते. सोमवारी शेअर बाजारात 516 समभागांमध्ये अप्पर सर्कीट लागले होते. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 381 अंकांच्या वाढीसह 60,059 वर आणि निफ्टी 104 अंकांच्या वाढीसह 17.895 अंकांवर बंद झाला होता. कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात 83 डॉलरवर पोहचले होते.

यावर्षी कच्च्या तेलाच्या किंमतीत 64 टक्के तेजी दिसली. याआधी अमेरिकेतील बाजार घसरणीसह बंद झाले.

Related Stories

रॅपिडोची रेंटल बाईक सर्व्हिस सेवा 6

Patil_p

वॉलमार्टला फ्लिपकार्ट व फोन पेचा आधार

Patil_p

नियम न पाळणाऱया 14 बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचा परवाना रद्द

Patil_p

वर्षभरापर्यंत कर्मचारी कपात नाही

Patil_p

सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्री तेजीत

Patil_p

भारती एक्सा जनरल इन्शुरन्स प्रीमियम उत्पन्नात 38 टक्क्मयांनी वाढ

Patil_p
error: Content is protected !!