तरुण भारत

कदंब कर्मचाऱयांचा आझाद मैदानावर धरणे मोर्चा

प्रतिनिधी /पणजी

कंदब महामंडळ कामगारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी कदंब कर्मचारी संघटनेने आयटकच्या झेंडय़ाखाली येथील आझाद मैदानावर सोमवारी धरेणे धरले होते. अमाच्या मागण्या त्वरीत पूर्ण करून कदंब कर्मचाऱयांना न्याय द्या अशी मागणी कर्मचाऱयांनी केली. माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, यांनीही आझाद मैदानावर येऊन कदंब कर्मचाऱयांना पाठींबा दिला.

Advertisements

सोमवारी सकाळी दहा वाजल्या पासून सुरु झालेल्या या धरणे मोर्चात कामगार नेते क्रिस्तोफर पोन्सेका, राजू मंगेशकर, प्रसन्ना उत्तगी. कदंब कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी चंद्रकात चोडणकर, नासीमेंटो लोबो, जी. लोबो, अत्माराम गवस, उल्हास नाईक, रविंद्र नाईक, संजय अमोणकर, सुचीता धाकणकर यांच्यासह अनेक कर्मचारी धरणे कार्यक्रमात सहभागी झाले होते. कदंब चालक तसेच इतर काही कामगारांना अद्यापही सातवे वेतन आयोग लागू करण्यात आलेले नाही त्यांना ते लागू करावे तसेच जेव्हा पासून सातवे वेतन आयोग लागू करण्यात आले तेव्हापासूनची ठकबाकी देण्यात यावी, बदली चालक व कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱया चालकांना समान काम समान पगार द्यावा, कंत्राटी कामगार, बदली चालकना नोकरीत कायम करावे, कदंब महामंडळाने इलेक्ट्रीक वाहने सुरु केली असून ती चालविण्यासाठी कदंब महामंडळातील चालकांचा वापर करावा, कंत्राटी कर्मचाऱयांना किमान 25 हजार रुपये महिना वेतन द्यावे अशा विविध मागण्या कंदब कर्मचारी संघटनेने सरकार समोर मांडल्या आहेत. वेळीच मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा इसाराही संघटनेने दिला आहे

Related Stories

ओडिशाविरूद्धच्या विजयाने जमशेदपूरच्या बाद फेरी प्रवेशाच्या आशा कायम

Amit Kulkarni

पणजीतील खड्डे त्वरित बुजवा

Omkar B

राणे राजकीय निवृत्तीच्या तयारीत?

Amit Kulkarni

फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन

Amit Kulkarni

गोव्याच्या भविष्याशी चालविलेला खेळ थांबवा

Amit Kulkarni

नेव्हल एव्हिएशन म्युझीयमचा आज 23 वा वर्धापनदिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!