तरुण भारत

नेव्हल एव्हिएशन म्युझीयमचा आज 23 वा वर्धापनदिन

प्रतिनिधी /वास्को

दाबोळी येथील नेव्हल एव्हिएशन म्युझीयमचा आज 12 रोजी 23 वा वर्धापनदिन आहे. या म्युझियमचे उद्घाटन 12 ऑक्टोबर 1998 रोजी नौदलाचे पहिले पायलट ऍडमिरल आर एच ताहीलियानी (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले होते. ऍडमिरल ताहिलियानी हे आयएनएस विक्रांत या युद्धनौक्sवर हॉकर सी हॉक लढाऊ विमान उतरविणारे पहिले पायलट होते.

Advertisements

दाबोळीतील नेव्हल एव्हिएशन म्युझियम आशिया खंडातील एकमेव संग्रहालय असून या संग्रहायलाच्या कालांतराने विस्तार होत गेला. सध्या या  संग्रहालयात 14 प्रकारची हवाई जहाजे आहेत. या संग्रहालयात ऐतिहासिक सुपर कॉन्स्टेलेशन विमानांचे जतन करण्यात आले आहे. ज्यामुळे भारतीय नौदलाला हवाई दलाकडून सागरी गस्तीची जबाबदारी पार पाडण्यास मदत लाभली आहे.

या संग्राहालयात नौदलाच्या हवाई प्रवासाची ऐतिहासिक माहिती, 1971 च्या भारत-पाक युद्धा दरम्यानच्या हवाई ऑपरेशनची माहिती, वैमानिक व विविध विमानांसह संग्रहाचा विस्तार करण्यात आला आहे. देश सेवेसाठी बलिदान दिलेल्या पुरूष व महिलांना समर्पित म्हणून एक स्मारक कक्ष या ठिकाणी उभारण्यात आला आहे. हवाई शस्त्रांचे प्रदर्शन, भारतीय नौदलाच्या हवाई स्टेशन व हवाई पथकांचा इतिहास या म्युझियममध्ये असून एक मीनी थिएटरही आहे.

या मुझियमध्ये विद्यार्थी, हवाई प्रवासी, पर्यटक व स्थानिक नागरिक भेटी देत असतात. या संग्रहालयाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आज या म्युझीमयचा 23 वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.

Related Stories

दिवाळीसाठी नरकासूर मुखवटे, आकाश कंदिल विक्रीस आलेल्या विक्रेत्यांकडून स्विकारले 2500 रु.

Omkar B

चोवीस तासात कोरोनाचे 12 बळी

Patil_p

कुंडई उपसरपंचपदी सर्वेश जल्मी

Amit Kulkarni

दुर्गा – वेळ्ळी येथे 45 वर्षांनंतर बहरली शेती

Omkar B

विल्सन गुदिन्हो व ताहीर विरोधात गुन्हा नोंद

Patil_p

दबाव वाढल्यानेच पर्यटन सुरू करण्याचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!