तरुण भारत

आपच्या रोजगार यात्रेस सर्वत्र जोरदार प्रतिसाद

कुंकळ्ळी, शिरोडा, मांद्रे शिवोलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

आम आदमी पक्षाच्या रोजगार यात्रांना सध्या सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत असून युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बूथ बैठका गाजू लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसात कुंकळी, शिरोडा, मांद्रे आणि शिवोली येथे रोजगार यात्रांचे आयोजन करण्यात आले. कुंकळ्ळी येथे यात्रेचे नेतृत्व आप कुंकळी विधानसभा प्रभारी प्रशांत नाईक यांनी केले. त्यावेळी सुमारे 100 स्वयंसेवक होते. त्यानंतर नाईक यांनी बूथ स्तरावरील बैठका घेतल्या. या सभांना मोठय़ा संख्येने स्थानिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्थानिक आमदार क्लाफासियो डायस याच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली.

कुंकळीचे तरुण सरकारी आणि खाजगी नोकऱयां मिळत नसल्याने निराश आहेत. अरविंद केजरीवाल यांनी खाजगी क्षेत्रात 80ज्ञ् नोकऱया आरक्षणाचे आश्वासन दिले आहे तसच अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या कौशल्य विद्यापीठाबद्दल देखील इथले स्थानिक उत्साहित असल्याचे कुंकळीचे विधानसभा प्रभारी प्रशांत नाईक म्हणाले

केजरीवाल यांच्या रोजगार हमीवर आपली मोहीम सुरू ठेवत आम आदमी पक्षाची रोजगार यात्रा आज शिरोडा आणि मांदेमध्ये पोहचली. शिरोडा यात्रेचे नेतृत्व पक्षाचे वरि÷ उपाध्यक्ष महादेव नाईक यांनी केले. त्यावेळी बोलताना नाईक, यांनी वर्षानुवर्षे आमचा विश्वासघात झाला आहे, आमचे तरुण नोकरीच्या संधींपासून वंचित आहेत, अशावेळी केवळ आपच तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करू शकतात, असे सांगितले.

भाजपने तरुणांना नोकऱयांचे आश्वासन देऊन वेळोवेळी फसवले. या पार्श्वभूमीवर शिरोडाच्या रहिवाशांनी आपच्या रोजगार हमीवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अरविंद केजरीवाल नोकर भरतीत पारदर्शकता आणतील आणि खासगी क्षेत्रात गोवेकरांसाठी 80 टक्के आरक्षण देतील यावर गोमंतकीयांचा ठाम विश्वास असल्याच महादेव नाईक म्हणाले.

मांदे आणि शिरोडा या दोन्ही ठिकाणी आपच्या शेकडो स्वयंसेवकांनी यात्रेत उपस्थिती लावली. तसेच स्थानिकांचाही मोठा सहभाग लाभला. मांदे विधानसभा प्रभारी ऍड प्रसाद शाहपूरकर यांनी मांदेमध्ये सभांना संबोधित केले. सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी विद्यमान सरकार बाबत आपली नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊन आणि महामारीमुळे पर्यटन व्यवसायावर उद्भवलेल्या समस्येवर शहापूरकर यांनी प्रकाश टाकला. पर्यटनावर अवलंबून असलेल्या टॅक्सीकरांनी आपली उपजीविका गमावली आहे. तसेच पर्यटनावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे मदतीशिवाय राहली. या परिस्थितीत केजरीवाल यांनी दिल्लीतील टॅक्सीकरांना दिलेल्या पाठिंब्याचे स्थानिकांनी कौतुक केले.

वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या केजरीवाल मॉडेलबद्दल गोमंतकीयांमध्ये उत्सुकता आहे. कुंकळी येथील तरुणांना देखील नोकऱयांची फसवी आश्वासने देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर आप नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणेल याबद्दल स्थानिकांनी विश्वास व्यक्त केला.

कुंकळीच्या युवकांना सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील नोकऱयांमध्ये त्यांची फसवणूक झाल्याचे वाटते. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱयांसाठी 80टक्के  आरक्षण ही काळाची गरज आहे. तसेच सरकारी नोकऱयांच्या बाबतीतही 100 टक्के पारदर्शकता आवश्यक आहे. कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे रोजगारक्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बेरोजगार युवकांचा आप ला पाठिंबा

लॉकडाऊनमुळे शिवोली मध्ये बेरोजगारीची समस्या उद्भवली आहे हा मतदारसंघ पर्यटनावर अवलंबून आहे. अनेक हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट मालक नुकसानीत आहेत. टॅक्सीचालकांनी आपली उपजीविका गमावली आहे तसच पर्यटनावर अवलंबून असलेली बरीच कुटुंबे या काळात पूर्णपणे मदतीशिवाय राहिली. पर्यटनातील मंदीमुळे नोकऱया गमावलेले अनेक युवक आप ला पाठिंबा देत आहेत कारण पक्षाने नोकऱया मिळेपर्यंत काम आणि 5000 रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Stories

करासवाडा म्हापसा येथे क्षुल्लक कारणावरून भांडण, हाणामारी, हवेत गोळीबार

Amit Kulkarni

शिक्षक मोहनदास सुर्लकर यांचे कोरोनामुळे निधन

Patil_p

तिन्ही केंद्रीय प्रकल्पांचे काम थांबवावे,

Patil_p

अरविंद केजरीवाल आज गोव्यात

Amit Kulkarni

यशवंत विद्यार्थी गावचे भूषण

Amit Kulkarni

साखळीत बुधवारी आढळले 17 कोरोना रूग्ण.

Omkar B
error: Content is protected !!