तरुण भारत

मनपाच्या विषय समिती सभापती निवडी आज

समाजकल्याण, महिला व बालकल्याणच्या निवडीभाजप-काँग्रेस आघाडीत सामना

प्रतिनिधी/सांगली

Advertisements

महापलिकेच्या समाजकल्याण तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींची निवड मंगळवारी होत आहे. सध्या दोन्ही समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.  भाजपकडून समाजकल्याणसाठी सुब्राव मद्रासी तसेच महिला व बालकल्याणसाठी गीतांजली ढोपे-पाटील यांचे तर अनुक्रमे राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात व काँग्रेसच्या शुभांगी साळुंखे यांनी अर्ज दाखल केले.

समाजकल्याणमध्ये भाजपचे 7, राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा एक सदस्य आहे. स्नेहल सावंत व आनंदा देवमाने हे महापौर निवडीवेळी राष्ट्रवादीसोबत आले होते. आताही ते आघाडीसोबतच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. शिवाय आघाडीकडून स्नेहल सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असेही बोलले जात होते. राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी सावंत यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तर काँग्रेसने सभापती पदावर दावा केला होता. मात्र, काँग्रेसचे गळीत जुळले नाही. सोमवारी अडीच वाजेपर्यंत उमेदवारीचा घोळ सुरु होता.

अखेर अडीच वाजता काँग्रेसने राष्ट्रवादीकडे अर्ज भरण्याची विनंती केली.  चर्चेचे हे गुऱहाळ सुरू असतानाच भाजपने आनंदा देवमाने यांना गळाला लावले. ते दोन दिवसांपासून आघाडीच्या संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे आघाडीचे गणित बिघडले आहे. शेवटच्या क्षणी थोरात यांचा अर्ज भरला. विजयासाठी त्यांना देवमानेंशी संपर्क साधावा लागणार आहे. देवमाने यांच्या मतावरच थोरातांचे सभापती पद अवलंबून आहे.

महिला व बालकल्याणसाठी काँग्रेसच्या शुभांगी साळुंखे व भाजपच्या गीतांजली ढोपे-पाटील अशी लढत आहे. येथे भाजपचे 9 तर आघाडीचे 7 सदस्य आहेत. भाजपच्या नसीमा नाईक महापौर निवडीवेळी आघाडीसोबत होत्या. आताही त्या आघाडीसोबतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समितीत दोघांचे बलाबल समान होणार आहे. दरम्यान, नाईक यांना भाजपने व्हीप लागू केला आहे. त्यांच्या मतार यावर सभापतीपदाचे भवितव्य अवंलबून आहे.

दोन्ही समित्यांवर आमचेच वर्चस्व

दोनही समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. आताही ताब्यात राहतील. सभापती निवडीच्या पार्श्वभूमिवर दोन्ही समित्यांमधील पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजाविला आहे. दोन सदस्यांना पोस्टाने व्हीप पाठविला आहे, त्याची पोहोचही मिळाली आहे. फुटीराबाबत अपात्रतेची कायदेशीर प्रक्रियाही सुरूच राहणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दीपक श्ंिांदे-म्हैसाळकर, गटनेते विनायक सिंहासने यांनी सांगितले.

Related Stories

दिघंचीत नारळाच्या झाडावर वीज पडली; जीवितहानी नाही

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचा कहर ; एकाच दिवसात ४० रूग्ण

Abhijeet Shinde

अब तक केवळ १८० पथविक्रेत्यांना ओळखपत्र

Abhijeet Shinde

शेकापक्षाच्या सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणींच्या बरखास्तीचा निर्णय

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात नवे 830 रूग्ण तर 36 जणांचे मृत्यू

Abhijeet Shinde

परदेशवारीवरुन आलेल्या तरुणीची सोशल मिडीयावरुन बदनामी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!