तरुण भारत

दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद आश्रफ असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवाशी आहे. त्याच्याकडून एके-47 रायफल, 60 काडतुसे, हँड ग्रेनेड आणि दोन पिस्तुले जप्त करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

Advertisements

मोहम्मद आश्रफ या पाक दहशतवाद्याकडून दिल्ली आणि अनेक शहरांमध्ये हल्ल्याचा धोका होता. आयएसआयने दिल्लीसह देशभरात हल्ल्यांसाठी या दहशतवाद्याला प्रशिक्षण दिल्याची माहिती मिळत आहे. तो दिल्लीतील लक्ष्मीनगर येथे राहत होता. नेपाळमार्गे तो दिल्लीला पोहोचला होता. त्याच्याकडे बनावट भारतीय ओळखपत्र होते. लक्ष्मीनगरच्या रमेश पार्क परिसरात त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 454 नवे कोरोना रुग्ण; 8 मृत्यू

Rohan_P

म्युकरमायकोसिस आता साथीचा आजार

Amit Kulkarni

बेंगळूर शहरातील रुग्णसंख्या 216 वर

Patil_p

एका विहिरीला दिले जीवनदान

Patil_p

india-vs-australia : ‘गाबा’वर भारतीय संघाची ऐतिहासिक विजयी नोंद

triratna

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज

Patil_p
error: Content is protected !!