तरुण भारत

किल्ले वंदनगडचे विद्रूपीकरण थांबवा

प्रतिनिधी / सातारा :

वाई तालुक्यात असलेल्या किल्ले वंदनगडासंदर्भात पत्रव्यवहार करताना सातारा वनविभागाने एका पत्रात त्याची नोंद ‘पीर किल्ले वंदनगड’ केली आहे. हे विद्रूपीकरण थांबवण्यात यावे, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक विजयकुमार काटवटे, विश्व हिंदु परिषदेचे शहर मंत्री जितेंद्र वाडकर, श्री शिवप्रतिष्ठानचे प्रतिक कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.

Advertisements

सातारा जिल्ह्यातील वंदनगडाच्या इतिहासाच्या नोंदी पहाता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून त्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयी घोडदौड करून स्वराज्याच्या सिमांचा विस्तार केला. सातारा जिल्ह्यातील चंदनगड व वंदनगड स्वराज्यात दाखल झाले.
या गडकोटांची नावं जाणिवपुर्वक पालटुन समाजात ताणतणाव निर्माण करण्याचे काम काही शासकीय विभागातुन होताना दिसत आहे. गडाचे मुळ नाव ‘वंदनगड’ असताना त्या गडाच्या संदर्भात पत्रव्यवहार करताना सातारा वनविभागाने एका पत्रात त्याची नोंद ‘पीर किल्ले वंदनगड’ केली आहे असे आढळून आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही गडाला अशा पद्धतीने नाव दिले आहे, असे कोठेही इतिहासात नोंद नाही. तसेच जिल्ह्यातील व इतिहासाचा अभ्यास केला असता त्यातही या गडाचे नाव वंदनगड आहे असे लक्षात येते. इतिहासात नोंदी असतानाही सातारा जिल्हा वनविभागाने त्याचा पत्रव्यवहार करताना या गडाचे नाव पालटुन ‘पीर किल्ले वंदनगड’ असे केले आहे. हे विद्रूपीकरण थांबवण्यात यावे, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या गडकोटांचे नाव परस्पर बदलणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Stories

सातारा जिल्ह्यात उच्चांकी बाधित वाढ सुरूच : 1933 बाधित

datta jadhav

सातारा : सफरचंद वाहतूक करणारा ट्रक उंब्रज येथे उलटला

Abhijeet Shinde

सातारा : वृक्ष लागवडीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

datta jadhav

सातारा : बावधनच्या दोघांसह वाईतल्या एकाला तीन महिने तडीपार

Abhijeet Shinde

सातारा : वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, वाहनधारक हैराण

Abhijeet Shinde

जिह्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

Patil_p
error: Content is protected !!