तरुण भारत

एमजी ऍस्टर एसयूव्ही लाँच

आर्टिफिशियल इंटेलिजेंससह विविध फिचर्स

नवी दिल्ली 

Advertisements

  एमजी मोटार इंडियाने भारतामध्ये नवीन ऍस्टर कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली आहे. यामध्ये एमजी मोटारची देशातील पाचवी कार आहे. एसयूव्हीची सुरुवातीची किमत 9.78 लाख रुपये आहे. यासोबतच कंपनीचे शार्प ट्रिप मॉडेल असूय यांची किमत ही 16.78 लाख रुपये एक्स शोरुम आहे. कार्यालयीन बुकिंग हे 21 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

पहिली डिलिव्हरी ही नोव्हेंबर ते डिसेंबर याच्या दरम्यान देण्यात येणार आहे. नवीन एमजी ऍस्टर कंपनीचे पहिले मॉडेल आहे. यामध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारीत टेक्नॉलॉजीची सुविधा मिळणार आहे. कारमध्ये ग्लेज रेड, स्पाईड ऑरेंज, आरोरा सिल्वर, स्टाररी ब्लॅक आणि कँडी व्हाईट कलरचा पर्याय मिळणार आहे.

 कारमध्ये केबीनमध्ये ऍपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटोसोबत 10.1 इंच इंफोटेनेमेन्ट स्क्रीन, 7 इंच इंस्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे.

दोन इंजिनचा पर्याय

ऍस्टर एसयूव्हीमध्ये दोन इंजिनचा पर्याय मिळणार आहे. पहिले 1.4 लिटर, चार सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. जे 5600 आरपीएमवर 138 बीएचपी आणि 3600 आरपीएमवर 220 एनएम जनरेट करते.

स्पर्धा महिंद्रा एक्सयुव्ही700सोबत

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एमजी ऍस्टर कारची टक्कर हय़ुंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, फॉक्सवॅगन टायगून, निसान किक्स, रेनो डस्टर आणि मारुती सुझुकी एस क्रॉस यांच्यासोबत आहे. दुसरीकडे किमतीच्या बाबत टक्कर मात्र एमजी हेक्टर आणि टाटा सफारीसोबत राहणार आहे.

Related Stories

ऍथरची डिसेंबरपर्यंत मोफत चार्जिंगची सुविधा

Amit Kulkarni

90 कि.मी. मायलेजवाली बजाजची दुचाकी दाखल

Patil_p

नव्या फॉर्च्यूनर गाडीच्या बुकिंगला प्रतिसाद

Patil_p

‘केटीएम’च्या नव्या दुचाकीचे सादरीकरण

Amit Kulkarni

रॉयल इनफिल्डचा महिला बाईकस्वारांसाठी पेहराव

Patil_p

महिंद्रा डिझेल एक्सयुव्ही-500 बाजारात

Patil_p
error: Content is protected !!