तरुण भारत

सेन्सेक्सचा 149 अंकांच्या मजबुतीसह नवा विक्रम

निफ्टीचा प्रवास 18,000 अंकांजवळ- सलग चौथ्या सत्रात तेजी

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात बँक आणि टिकाऊ साहित्याच्या कंपन्यांच्या समभागात तेजी राहिल्याने सेन्सेक्स मंगळवारी 149 अंकांनी वधारुन नवा विक्रम नेंदवत मजबूत बंद झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्सने सलग चौथ्या सत्रात तेजी कायम ठेवली आहे.

चढउताराच्या प्रवासात दिवसभरात सेन्सेक्सने 148.53 अंकांच्या मजबूतीसह 0.25 टक्क्यांची तेजी प्राप्त करत निर्देशांकाने 60,284.31 वर नवा टप्पा प्राप्त करुन उच्चांकी स्तर गाठला आहे. यासोबतच दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंकांनी वधारुन 0.26 टक्क्यांनी वाढून निर्देशांक 17,991.95 वर बंद होत नवा विक्रम नोंदवला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये टायटनचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, नेस्ले इंडिया, आयटीसी, ऍक्सिस बँक तसेच टाटा स्टील यांचे समभाग लाभात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस तसेच सन फार्मा यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.

तिमाहीमधील कंपन्यांचे अहवाल सादर होत असल्याचा लाभ हा देशातील बाजाराला होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आयटी समभागात विक्री राहिल्याचाही परिणाम देशातील बाजारावर राहिला. जागतिक बाजाराचा कल हा नकारात्मक राहिल्याने काही काळ दबावाचे वातावरण राहिले होते.

प्रमुख क्षेत्राचा प्रभाव

सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच टिकाऊ साहित्याची निर्मिती करण्यात येणाऱया कंपन्यांचे समभाग मजबूत स्थितीत राहिल्याने अंतिम क्षणापर्यंत बाजार सकारात्मक स्थितीत राहिला होता. अन्य आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की तसेच दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे बाजार घसरणीत राहिले आहेत.

Related Stories

अव्हेन्यु सुपरमार्टचे समभाग जोमात

Amit Kulkarni

पाच दिवसात प्रथमच बाजारात तेजीची उसळी

tarunbharat

वर्क फ्रॉम होम मोहिमेतून होतेय बचत

Patil_p

फ्लिपकार्ट करणार 4 हजार जणांची भरती

Patil_p

किरकोळ व्यावसायिक सरकारच्या पाठिशी

Patil_p

व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी एअरटेलचे ब्लूजींस ऍप

Patil_p
error: Content is protected !!