तरुण भारत

200, 500, 2000 रुपयांच्या नोटांनी सजावट

एकूण 5.16 कोटी रुपयांच्या नोटांचा वापर

आंध्रप्रदेशच्या नेल्लोर येथील कन्याका परमेश्वरी मंदिराला नवरात्रोत्सवानिमित्त 5 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या नोटांनी सजविण्यात आले आहे. या मंदिरात वर्षात विविध तिथीनिमित्त विविध रुपांमध्ये देवीची पूजा करण्यात येते. नवरात्र-दसरोत्सवादरम्यान देवीला धनलक्ष्मीच्या रुपात पूजले जाते.

Advertisements

100 हून अधिक स्वयंसेवकांनी 5 कोटी 16 लाख रुपयांच्या एकूण मूल्याच्या चलनी नोटांसोबत मंदिर सजविण्यासाठी दीर्घकाळ काम केले आहे. सजावटीसाठी 2000 रुपये, 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.

4 वर्षांपूर्वी देखील 11 कोटी रुपयांच्या खर्चातून कन्याका परमेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तेव्हापासून नवरात्रोत्सव दरवर्षी भव्य स्वरुपात साजरा करण्यात येतो. यंदा देखील सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होतोय.

7 किलोग्रॅम सोने आणि 60 किलोग्रॅम चांदी देवीच्या मूर्तीला सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येते अशी माहिती नेल्लोर शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मुक्कला द्वारकानाथ यांनी सांगितले आहे.

मागील वर्षी या मंदिरात 1 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या नोटांनी सजावट करण्यात आली होती. मागील वेळी माळा आणि गुच्छ तयार करण्यासाठी विविध रंगांच्या नोटांचा वापर करण्यात आला होता. तर नेल्लोरमध्ये एवढी रक्कम फक्त पताकांसारखी वापरणे सामान्य बाब मानली जाते.

Related Stories

शुक्राणू दिल्यानंतर त्वरित पतीचा मृत्यू

Amit Kulkarni

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; 13 प्रमुख राज्यांमध्ये झाले सर्वेक्षण

Rohan_P

करवंटीपासून साकारु नाना शोभेच्या वस्तू

Omkar B

वाचनात माणूस घडविण्याचे सामर्थ्य : उद्धव साळवे

prashant_c

मंडई म्हसोबा मंदिर उत्सव : दाक्षिणात्य पद्धतीची आकर्षक पुष्पसजावट

Rohan_P

डॉ. पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता सावंत,अलका पांड्ये विजयी

prashant_c
error: Content is protected !!