तरुण भारत

वामिका गब्बीकडून चित्रिकरणास प्रारंभ

विशाल भारद्वाज यांचा ‘खूफिया’ चित्रपट

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी अलिकडेच स्वतःचा आगामी चित्रपट ‘खूफिया’ची घोषणा केली होती. त्यांच्या या थ्रिलर चित्रपटात अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अलिकडेच वामिकाने या चित्रपटाचे चित्रिकरण दिल्लीत सुरू केले आहे.

Advertisements

वामिकाने स्वतः देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःच्या या चित्रपटाची घोषणा केली आहे. काही गोपनीय कागदपत्रे माझ्याकडे आहेत असे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या चित्रपटात वामिकासोबत तब्बू आणि अली फजल देखील मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. ‘खूफिया’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.

वामिकाने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिट्टू या हिंदी चित्रपटात ती दिसून आली होती. तर ग्रहण या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती.

Related Stories

‘सनशाईन स्टुडिओ’चे ‘बॅकवॉटर्स’ चित्रपटातून निर्मितीकडे पाऊल

Patil_p

संगीतकार अनु मलिक यांच्या आईचे निधन

Rohan_P

गौरी खानने लेकीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Patil_p

‘डार्लिंग’ रितिका

tarunbharat

चांगले काम सुरू ठेवण्याची इच्छा

Patil_p

‘नखरेवाली’ होणार सारा अली खान

Patil_p
error: Content is protected !!