तरुण भारत

इराकमध्ये शिया मौलवी विजयासमीप

18 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या विरोधात आंदोलन उभे करणारा नेता -इराणचीही चिंता वाढणार

वृत्तसंस्था / बगदाद

Advertisements

इराकमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अमेरिकेच्या विरोधात 18 वर्षांपूर्वी 2003 मध्ये आंदोलन उभे करणारे शिया मौलवी मुक्तदा अल सद्र यांचा पक्ष सदरिस्ट मूव्हमेंट विजयाच्या समीप पोहोचला आहे. इराकच्या प्रतिनिधिगृहात एकूण 329 जागा असून अल सद्र यांच्या पक्षाने 75 जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

इराकच्या सर्व 18 प्रांतांमध्ये अल सद्रचे बहुतांश उमेदवार आघाडीवर हेत. पण निवडणुकीचा निकाल अद्याप पूर्णपणे लागलेला नाही. येथील 329 जागांसाठी 3,449 उमेदवार उभे राहिले होते. अल सद्र यांच्या दाव्यानुसार त्यांचा पक्ष आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालामध्ये आघाडीवर आहे. त्यांच्या पक्षाने 2018 मध्ये 54 जागा जिंकल्या होत्या.

केवळ 41 टक्के मतदान

यंदाच्या निवडणुकीत केवळ 41 टक्के मतदान झाले होते. सद्दाम हुसैनच्या मृत्यूनंतर आतापर्यंत झालेल्या 5 निवडणुकांमध्ये हे सर्वात कमी मतदान आहे. हा विजय भ्रष्टाचार, दहशतवाद, गरीबी आणि अन्यायाच्या विरोधातील लढाईचा शंखनाद असल्याचे अल सद्र यांनी म्हटले आहे.

शिया मुस्लिमांचे वर्चस्व

इराकमध्ये शिया मुस्लीम बहुसंख्य आहेत. राजकारणापासून व्यापारावर देखील शिया मुस्लिमांचेच वर्चस्व आहे. येथे 66 टक्के शिया, 32 टक्के सुन्नी, 1.5 टक्के कुर्द आणि 0.5 टक्के अन्य धर्मांना मानणारे लोक आहेत.

इराणसमर्थित पक्षाला झटका

इराकचे माजी पंतप्रधान नूरी अल मालिकी यांच्या नेतृत्वाखालील दौलत अल कानून आघाडीला या निवडणुकीत मोठे नुकसान झेलावे लागले आहे. त्यांच्या पक्षाला आतापर्यंत केवळ 14 ठिकाणी यश मिळाले आहे. त्यांना इराणचे समर्थक मानले जाते. मालिकी यांनी इराकमधून इस्लामिक स्टेटचा खात्मा करविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2019 मध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. याचबरोबर 2 वर्षांपूर्वी स्थापन एमटिदाद पक्षाने 9 जागा जिंकल्या आहेत.

सदरिस्ट मूव्हमेंट म्हणजे काय?

सदरिस्ट मूव्हमेंट एक इराकी इस्लामिक आंदालेन असून याचे नेतृत्व अल-सद्र करत आहेत. आंदोलनाला पूर्ण इराक आणि विशेषकरून शिया मुस्लिमांचे व्यापक समर्थन आहे. आंदोलनाचे लक्ष्य धार्मिक कायदे आणि प्रथापरंपरांना बळ देणे आहे.

इराणविरोधी सद्र

मुक्तदा अल सद्र केवळ अमेरिकाच नव्हे तर इराकच्या अंतर्गत विषयांमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू पाहणाऱया देशाच्या विरोधात आहेत. अल सद्र 2003 मध्ये इराकमध्ये  अमेरिकेच्या सैन्याच्या उपस्थितीला विरोध करून चर्चेत आले होते. पण ते सातत्याने इराणवरही टीका करत असतात. इराकमध्ये अमेरिकेच्या सेन्यावर हल्ला करणारे अनेक दहशतवादी गट आहेत. इराण या गटांना मदत पुरवत असून अल सद्र यांचा याला विरोध आहे.

Related Stories

तुर्कस्थानात भूकंप : 6 जणांचा मृत्यू

Patil_p

मुल्ला बरदारची सीआयए प्रमुखांनी घेतली भेट

Patil_p

बुकरच्या शर्यतीत 13 साहित्यिक

Patil_p

एर्दोगान यांच्यानंतर इम्रान यांची मॅक्रॉन यांना धमकी

Patil_p

ब्राझील सरकारवर वाढता दबाव

Patil_p

वडिलांपासून स्वातंत्र्य हवे!

Amit Kulkarni
error: Content is protected !!