तरुण भारत

अमेरिकेत विमान कोसळून 2 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात सोमवारी एक छोटे विमान नागरी भागात कोसळले आहे. हे विमान दोन घरांवर कोसळले आणि स्फोटानंतर तेथे आग लागली आहे. एका डिलिव्हरी ट्रकसमवेत अनेक वाहने या स्फोटाच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. तर 10 घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisements

विमान कोसळल्यानंतरची चित्रफित समोर आली आहे. यात घरे आणि वाहने पेटत असताना दिसून येते. स्फोटाचा आवाज ऐकताच पेटत असलेल्या घरांच्या दिशेने धाव घेतली आणि आत अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर एका डिलिव्हरी ट्रकच्या चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

हे विमान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कॅलिफोर्नियाच्या सेंटी शहरात कोसळले आह. हे एक ट्विटन इंजिन 6 आसनी विमान होते, जे ऍरिझोनामधून झेपावले होते. दुर्घटनास्थळानजीकच एक शाळा आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याच विद्यार्थ्याला ईजा झालेली नाही.

Related Stories

स्कार्फ घालून सायकल चालविणारी अफगाणी मुलगी

Patil_p

व्हिएतनाममध्ये संक्रमणाचा धोका

Patil_p

स्वीत्झर्लंडमध्ये सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे

Patil_p

बांगलादेशात 1 जुलैपासून कठोर लॉकडाउन

Patil_p

18 वर्षांनी संगणकाच्या मदतीने बोलू लागला

Patil_p

तालिबानच्या समर्थनार्थ पाककडून पंजशीरवर बॉम्बहल्ला

datta jadhav
error: Content is protected !!