तरुण भारत

कोल्हापूरचा शाही दसरा शुक्रवारी रंगणार!

प्रतिनिधी / कोल्हापूर

येत्या शुक्रवारी 15 ऑक्टोबर कोल्हापूरचा शाही दसरा साजरा होणार आहे. ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपती परिवाराच्या उपस्थितीत विजया दशमीदिनी सिमोलंघनाचा सोहळा रंगणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा सोहळा पारंपरीक पद्धतीने आयोजित केला आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा मंगळवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली. तमाम करवीरवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

Advertisements

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे शाही दसरा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे गतवर्षी कोरोनामुळे शाही दसऱयात सहभागी होण्याची, त्याचा आनंद लुटण्याची संधी हुकलेल्या तमाम करवीरवासीयांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

करवीर अर्थात कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा साऱया देशविदेशात प्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या दसऱयाप्रमाणे कोल्हापूरच्या शाही दसऱयाबद्दल दरवर्षी उत्सुकता असते. ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत होणाऱया या सोहळ्याला कोल्हापूरच्या परंपरेत वेगळे आणि मानाचे स्थान आहे. विजयदशमी दिवशी होणाऱया पारंपरीक दसऱयासाठी करवीर निवासिनी आई अंबाबाई, तुळजाभवानी, गुरूमहाराज यांच्या पालख्या दसरा चौकात येत असतात. श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे, यशस्वीनीराजे आदी छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत सिमोलंघनाचे सोने लुटण्याचा सोहळा होत असतो. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह करवीरवासीय हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत असतात. सूर्यास्ताला होणाऱया सोहळ्याला छत्रपती घराण्यातील सदस्यांचे ब्रिटीशकालिन मेबॅक कारमधून आगमन झाल्यानंतर प्रारंभ होतो.

असा हा नयमरम्य सोहळा गतवर्षी 2020 मध्ये कोरोनामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी रद्द केला होता. यंदा हा सोहळा होणार की नाही या बद्दलही उत्सुकता होती. शाहू महाराज यांनी मंगळवारी अधिकृत घोषणा केल्याने यंदा दसरा चौकात परंपरेनुसार विजयादशमीचा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

`तरुण भारत’चे वृत्त तंतोतंत खरे

यंदाचा शाही दसरा होणार की नाही याबद्दल चर्चा सुरू असताना `तरुण भारत’ने गुरूवार 7 ऑक्टोबरच्या अंकात यंदाचा शाही दसरा होणारच या शीर्षकाची बातमी दिली होती. त्यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिक्रियाही दिली होती. मंगळवारी त्यांच्या अधिकृत घोषणेनंतर वृत्त तंतोतंत खरे ठरले.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 98 हजार 800 प्रतिबंधक डोस

Abhijeet Shinde

जमत नसेल तर सत्ता सोडा,चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Abhijeet Shinde

कोल्हापूरात  महापुराने बाधित ऊस क्षेत्राच्या तोडणीबाबत आढावा बैठक

Abhijeet Shinde

शिक्षक,पदवीधरमध्ये रंगणार बहुरंगी सामना

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे एकावर चाकू हल्ला

Abhijeet Shinde

पश्चिम महाराष्ट्रातील 12.46 लाख कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!