तरुण भारत

‘डिझाईन बॉक्स’वर प्राप्तिकरचा छापा

अनेक राजकारण्यांचे सोशल मीडिया अकौंट हॅन्डल करणाऱया कंपनीवर धाड

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया अकौंट हॅन्डल करून प्रचार करणाऱया ‘डिझाईन बॉक्स’ या कंपनीच्या बेंगळूरमधील मुख्य कार्यालयावर मंगळवारी प्राप्तिकर अधिकाऱयांनी छापा टाकला आहे. नरेश अरोरा हे या कंपनीचे मालक आहेत.

डिझाईन बॉक्स ही कंपनी डी. के. शिवकुमार यांच्या निवडणूक सर्वेक्षणाची जबाबदारी सांभाळत होती. मागील महिन्यात या कंपनीशी शिवकुमार यांनी करार रद्द केल्याचे समजते.

बेंगळूरमधील कावेरी जंक्शनजवळील पॅलेज गुट्टहळ्ळी रोडवरील डिझाईन बॉक्स कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकून प्राप्तिकर अधिकाऱयांनी तपासणी केली. मंगळवारी सकाळी 6ः30 वाजता ही कारवाई करण्यात आली. कंपनीची बिले, कागदपत्रे तसेच कॉम्प्युटरमधील डेटा तपासणी केली. दोन कारमधून आलेल्या आठ अधिकाऱयांच्या पथकाने ही कारवाई केली.

देशातील अनेक राजकारण्यांचे प्रमोशन करणारी ही कंपनी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, आमदार एन. ए. हॅरिस यांचा पुत्र मोहम्मद नलपाड यासह अनेक राजकारणी या कंपनीकडून प्रचार, प्रमोशन सेवा मिळवित आहेत. डिझाईन बॉक्स कंपनी या नेत्यांचे सोशल मीडिया अकौंट हॅन्डल करून त्यांचा प्रचार करते. या मोबदल्यात मोठी रक्कम वसूल करते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या कंपनीचे खाती असणाऱया दोन बँकांमध्येही जाऊन प्राप्तिकर अधिकाऱयांनी माहिती जमविल्याचे समजते.

डिझाईन बॉक्स कंपनी सध्या पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या प्रचारात व्यग्र आहे. राजस्थान, छत्तीसगड, पुद्दुचेरी या राज्यांच्या निवडणुकीतही या कंपनीने राजकीय सोशल मीडिया अकौंट हॅन्डल करून प्रचार केला होता.

Related Stories

अर्भकाला आहेत 24 बोटे

Patil_p

उत्तराखंडात 54 नवे कोरोना रुग्ण, 15 दिवसानंतर एकाही रुग्णांचा मृत्यू नाही

Rohan_P

जम्मू काश्मीर : श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Rohan_P

12 ते 18 वयोगटासाठी लवकरच ‘झायडस’ची लस

Patil_p

रविशंकर प्रसाद तामिळनाडूच्या राज्यपालपदी?

Patil_p

प्रत्येक घरात कोब्रा

Patil_p
error: Content is protected !!