तरुण भारत

अमित खरे पंतप्रधान मोदींचे नवे सल्लागार

नवे शिक्षण धोरण लागू करण्यात महत्त्वाची भूमिका -चारा घोटाळा उघड करणारे अधिकारी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

शिक्षण तसेच माहिती-प्रसारण मंत्रालयाचे माजी सचिव अमित खरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या निवड समितीने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. पुढील दोन वर्षे किंवा पुढील आदेशापर्यंत ते या पदावर कायम राहणार आहेत.

30 सप्टेंबर रोजी खरे हे उच्च शिक्षण सचिव पदावरून निवृत्त झाले होते. सुमारे 34 वर्षांनी देशात नवे शिक्षण धोरण लागू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचबरोबर इंटरनेट मीडियासंबंधी नियम निश्चित करण्यातही त्यांचे योगदान राहिले आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

चारा घोटाळय़ाचा पर्दाफाश

अमित खरे हे भारतीय प्रशासकीय सेवेत 1985 च्या तुकडीचे बिहार-झारखंड कॅडरचे अधिकारी होते. 36 वर्षांच्या स्वतःच्या कारकीर्दीत त्यांनी भारत सरकारसोबतच झारखंड आणि बिहार सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱया पेलल्या आहेत. त्यांनीच चारा घोटाळय़ाचा पर्दाफाश केला होता. चाईबासा उपायुक्त पदावर असताना त्यांनी याप्रकरणी पहिला एफआयआर नोंदविला होता. त्यानंतर बिहारचे अनेक हायप्रोफाइल नेते आणि अधिकारी तुरुंगात गेले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनाही तुरुंगवास भोगावा लागला आहे.

दूरदर्शनच्या कक्षेचा विस्तार

अमित खरे यांनी माहिती-प्रसारण मंत्रालयात कार्यरत असताना दूरदर्शनच्या कक्षेचा विस्तार केला. झारखंड समवेत देशाच्या सुमारे 12 राज्यांमध्ये डीडी फ्री डिशची सेवा उपलब्ध करविली. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन झाले होते.

Related Stories

यूपी एसटीएफची PFI च्या शाहीन बाग कार्यालयावर छापेमारी

datta jadhav

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ रुग्णालयात दाखल

Rohan_P

मतदानासाठी दिल्ली सज्ज, सुरक्षा व्यवस्था कडेकोट

Patil_p

‘आनंदी देशा’त भारत 139 व्या स्थानावर

Patil_p

400 पाक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

Patil_p

राज्यात दिवसभरात 148 रुग्णांची भर

Patil_p
error: Content is protected !!