तरुण भारत

नेपाळमध्ये नदीत कोसळली बस, 28 ठार

वृत्तसंस्था / काठमांडू

नेपाळच्या मुगु जिल्हय़ात मंगळवारी झालेल्या बस दुर्घटनेत किमान 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. नेपाळगंज येथून मुगु जिल्हय़ाचे मुख्यालय गमगाधीच्या दिशेशने प्रवास करणारी बस पिना झयारी नदीत कोसळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisements

बसमधून प्रवास करणाऱयांमध्ये दुर्गापूजेनिमित्त विविध ठिकाणांहून स्वतःच्या मूळ गावी पोहोचणाऱया लोकांचे प्रमाण अधिक होते. सुरखेत येथून नेपाळच्या सैन्याचे हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी रवाना करण्यात आले आहे. मुगु हे ठिकाण काठमांडूपासून 650 किलोमीटर अंतरावर आहे.

करनाली प्रांताच्या मुगु जिल्हय़ातील पिना गावात झालेल्या दुर्घटनेत 24 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 4 जणांनी रुग्णालयात हलविताना अखेरचा श्वास घेतला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांचे प्रमाण अधिक आहे. हे सर्वजण नेपाळमधील सर्वात मोठय़ा सणासाठी भारतातून परतत होते. प्रारंभिक तपासानुसार टायर फुटल्याने बसवरील चालकाने संतुलन गमाविले होते. त्यानंतर ही बस दरीतील नदीत कोसळली होती.

Related Stories

नेपाळ : के.पी शर्मा ओली यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवले

datta jadhav

रशियात 5 लाखांहून अधिक बाधित

Patil_p

फोन कॅमेऱयाने कोरोनाची चाचणी

Patil_p

महात्मा गांधींच्या पणतीला तुरुंगवास

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 90 हजारांवर

datta jadhav

ऑस्ट्रेलियातील वणवे रोखण्यास मिळतेय यश

Patil_p
error: Content is protected !!