तरुण भारत

भारत-चायनीज तैपेई महिला फुटबॉल संघात आज लढत

वृत्त संस्था/ मॅनमा

भारत आणि चायनीज तैपेई महिला फुटबॉल संघामध्ये बुधवारी येथे मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.30 वाजता प्रारंभ होईल. बहरीनच्या दौऱयात चांगली कामगिरी केल्यानंतर आता भारतीय महिला फुटबॉल संघाची बुधवारच्या सामन्यात सत्वपरीक्षा ठरणार आहे.

Advertisements

गेल्या रविवारी झालेल्या बहरीन विरूद्ध लढतीत भारतीय महिला फुटबॉल संघाने दर्जेदार कामगिरी करत हा सामना 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी जिंकल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. नवे प्रमुख प्रशिक्षक थॉमस डर्नबी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला फुटबॉल संघाने अमिरातच्या दौऱयात दोन सामने जिंकले आहेत. भारताने संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन या संघांचा पराभव केला. आता भारतीय महिला फुटबॉल संघाला बुधवारच्या सामन्यात मानांकनात वरच्या स्थानावर असलेल्या चायनीज तैपेईशी कडवी लढत द्यावी लागेल.

बुधवारच्या सामन्यात भारतीय संघाला आपल्या डावपेचामध्ये बदल करावे लागतील. आक्रमक खेळ तसेच शॉर्ट पासेसवर भारतीय खेळाडूंना अधिक भर द्यावा लागेल. या दौऱयात भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा 4-1 असा पराभव केला. त्यानंतर दुबईत झालेल्या अन्य एका मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात टयुनेशियाने भारतावर 1-0 असा विजय मिळविला होता. येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भारतात होणाऱया एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने भारतीय महिला फुटबॉल संघाकरिता सरावासाठी हा दौरा आयोजित केला आहे.

Related Stories

विश्व कुस्ती स्पर्धेत भारताला पाच पदके

Patil_p

हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांना मुदतवाढ

Patil_p

माजी फुटबॉलपटू सेंट जॉन कालवश

Patil_p

इंग्लिश क्रिकेट हंगाम जुलैपर्यंत स्थगित

Patil_p

विंडीजचा फडशा, ब्रॉडचे 6 बळी

Patil_p

आयपीएलने उघडले क्रिकेटचे दरवाजे!

Patil_p
error: Content is protected !!