तरुण भारत

केएल राहुल पंजाब किंग्सशी फारकत घेण्याची शक्यता

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंजाब किंग्सतर्फे आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज व कर्णधार केएल राहुल यापुढे या संघातून खेळण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त आहे. आयपीएल 2022 साठी मेगा लिलाव होणार असून त्या पार्श्वभूमीवर काही प्रँचायझींनी केएल राहुलशी संपर्क साधला आहे. त्यानुसार, केएल राहुल प्रीती झिंटाच्या मालकीचा हा संघ सोडणार असल्याची शक्यता आहे.

Advertisements

आरटीएम कार्ड तरतुदीनुसार प्रँचायझीकडे सध्याचे काही खेळाडू आपल्याकडेच कायम राखून ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे, पंजाब प्रँचायझीची भूमिका देखील यात महत्त्वाची ठरु शकते. दि. 25 ऑक्टोबर रोजी आयपीएलमधील 2 नवे संघ देखील निश्चित होणार आहेत. सध्याच्या घडीला यासाठी अहमदाबाद व लखनौ आघाडीवर आहेत.

Related Stories

कोरोनामुळे अमेरिका, कॅनडा बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p

नागलचा पहिल्याच सामन्यात पराभव

Patil_p

अँडरसनने कुंबळेला मागे टाकले

Patil_p

सराव सामन्यात भारत अ विजयी

Patil_p

लॉर्ड्सवर शतक झळकावणारा केएल राहुल ठरला १० वा भारतीय खेळाडू

Amit Kulkarni

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर शिक्कामोर्तब

Patil_p
error: Content is protected !!