तरुण भारत

वर्ल्डकपसाठी धोनी मानधन घेणार नाही!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्त महेंद्रसिंग धोनी यासाठी कोणतेही मानधन घेणार नाही, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. दि. 17 ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणाऱया आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने धोनीची मागील महिन्यात मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे.

Advertisements

40 वर्षीय धोनीने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून 2019 वर्ल्डकप सेमीफायनल त्याच्यासाठी कारकिर्दीतील शेवटची लढत ठरली. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱया धोनीने भारताला 2007 टी-20 विश्वचषक व 2011 वनडे विश्वचषक जिंकून दिले आहेत. झारखंडच्या या दिग्गज खेळाडूने भारतीय संघातर्फे 90 कसोटी, 350 वनडे, 98 टी-20 सामने खेळले असून त्यात अनुक्रमे 4876, 10773 व 1617 धावांचे योगदान दिले आहे.

Related Stories

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

NZvsIND : भारतीय संघावर व्हाईटवॉशची नामुष्की

tarunbharat

रशियाची भारतावर मात

Patil_p

विराटचा 52 चेंडूत 90 धावांचा झंझावात

Patil_p

केन्टो मोमोटा पुनरागमनास सज्ज

Omkar B

धोनीमुळे आयपीएल अधिक रंगतदार होईल

Patil_p
error: Content is protected !!