तरुण भारत

आंतरराज्यीय चोरटय़ांची टोळी जेरबंद

लोणंद पोलिसांची कामगिरी – चारजण अटक – लोणंदमधील चोरीचा गुन्हा उघड

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

लोणंद व खंडाळा एमआयडीसी कंपनीत चोऱया करुन धुडगुस घालणाऱया  आंतरराज्यीय टोळीला लोणंद पोलिसांनी जेरबंद केली. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दोन गुह्यांची कबुली दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली लोणंद पोलिसांनी अभिनंदनीय कामगिरी केली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहाबुद्दीन हनिफ अन्सारी (वय 54, सध्या रा. हडपसर, पुणे मूळ रा. दिल्ली), शकील समी मोहम्मद चौधरी (वय 38, रा.ऐरोली, ठाणे), अजिम अब्दुलरहीम सलमानी (वय 30, रा. गुजरात), नागेश जगन्नाथ चव्हाण (वय 35, सध्या रा. वाघोली, पुणे मूळ रा. दहिगाव ता. कोरेगाव, सातारा) अशी अटक केलेल्या चार संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 रोजी रात्री लोणंद येथील कंपनीत घुसून अज्ञात टोळक्याने गार्डना मारहाण करत त्यांना बांधून कंपनीतून दीड लाख रुपये किंमतीची कॉपर वायर चोरुन नेली. लोणंद पोलीस या गुह्याचा तांत्रिक तपास करत असताना त्यांच्या हाती क्लू लागला. त्यानुसार या चोरीतील संशयित उत्तर प्रदेश, मुंबई, पुणे येथे असल्याचे समोर आले. यामुळे लोणंद पोलिसांनी दोन पथके तयार केली.

पहिले पथकाने या गुह्यातील मुख्य संशयित आरोपीला हडपसर, पुणे येथून अटक केली. दुसऱया पथकाने कुर्ला, मुंबई येथे धाड टाकली असता ते संशयित आरोपी शहापूर जि. ठाणे येथे असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेवून आणखी तिघांना अटक केली. चार संशयित आरोपी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी गुह्यांची कबुली दिली. या घटनेत एकूण सातजणांचा सहभाग असल्याचे समोर आले.

क्लिष्ट व गुंतागुंत असणाऱया या गुह्याचा पोलिसांनी छडा लावला असून अद्याप इतर संशयितांचा शोध घेणे व मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वायकर, फौजदार गणेश माने, हवालदार अविनाश नलवडे, महेश सपकाळ, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, विठ्ठल काळे, फैय्याज शेख, केतन लाळगे, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Related Stories

‘सेव्हन स्टार’ची पालिकेकडे नोंदच नाही

Amit Kulkarni

भुकेने मरण्यापेक्षा घरी जाऊन मेलो तर कुटुंबाला दर्शन होईल

Abhijeet Shinde

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav

फलटणमध्ये 9 लाख रूपये किमंतीचे गोमांस हस्तगत

Patil_p

कण्हेरमध्ये टेम्पो पलटी, 8 मजूर जखमी

datta jadhav

कोरोनामुक्तीचा आकडा 50 हजारावर

Patil_p
error: Content is protected !!