तरुण भारत

गवाणे येथील पुलाचा कठडा कोसळल्याने वाळपई-मोले दरम्यानच्या वाहतुकीला अडथळा

प्रतिनिधी /वाळपई

 वाळपई मोले दरम्यानच्या गवाणे याठिकाणी असलेल्या पुलाचा कठडा कोसळल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झालेला आहे .सध्यातरी अवजड प्रकारची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. यामुळे सदर कठडा आणखीन कोसळल्यास वाळपई मोले दरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.

Advertisements

 याबाबतची माहिती अशी की गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयात पावसाची संततधार सुरूच आहे. सोमवारी दिवस पडलेल्या पावसामुळे सदर कठडाखालून पाण्याचा प्रवाह वाढला व हा कठडा सोमवारी मध्यरात्री वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. यामुळे रस्त्याचा निम्मा भाग कोसळला असून या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्मयाचे बनले आहे. तरीसुद्धा दुचाकी व लहान चार चाकी वाहने सुरू असून अवजड प्रकारची वाहतूक बंद झालेली आहे .

सदर वाहतूक पूर्णपणे बंद करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे .अन्यथा रस्ता पूर्णपणे खचण्याची शक्मयता असून तसे झाल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार वाळपई शहरापासून मलपण आदी गावात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होत आहे. त्याचप्रमाणे मोले ,कुळे, धारबांदोडा अधिक भागात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्यात येत असतो. दर दिवशी या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. सदर पुलाचा कठडा कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर भाग हा सत्तरी तालुक्मयातील खोतोडा पंचायत क्षेत्रात येत आहे.

Related Stories

जनकल्याणासाठी कोणाचेही पाय पकडणार

Patil_p

युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

Amit Kulkarni

माजी आमदार, साहित्यिक, स्वा.सै. गजानन रायकर यांचे निधन

Omkar B

भाजपकडून लोकशाहीचा खून

Amit Kulkarni

माशेलची महाशाला कला संगम उत्कृष्ट संस्था

Amit Kulkarni

समाज कल्याण खत्यातर्फे देण्यात येणाऱया योजनेची रक्कम काही दिवसात मिळणार

Omkar B
error: Content is protected !!