तरुण भारत

विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग व रोबोटिक्स’चा अभ्यासक्रमात समावेश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाचे ज्ञान मिळाले पाहिजे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग व रोबोटिक्स’चा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नुवे येथे बोलताना दिली.

नुवे येथील माय दोस पोब्रेस हायस्कूलात आधुनिक विद्यान प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नुवेचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थितीत होते.

आधुनिक विद्यान प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने माय दोस पोब्रेस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानात विद्यान विषय उपक्रमाची भर घालण्याची चांगली संधी प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आम्हाला तंत्रज्ञाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी अशा आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा महत्वाच्या ठरतात. या प्रयोग शाळांतूनच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळत असते असे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.

नुवेचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून काल नुवे मतदारसंघात जवळपास 21 प्रकल्पाचा शुभारंभ व पायाभरणी करण्यात आली. त्यात बेतालभाटी येथे सुमारे 60 लाख रूपये खर्च करून गोन्सुवा तळय़ाचा विकास करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. सावंत व आमदार श्री. डिसा यांनी या तळय़ात जलसफर केली.

आमदार श्री. डिसा जेव्हा जेव्हा आपल्याला भेटायला आले, तेव्हा त्यांनी केवळ मतदारसंघातील विकासकामे व मनुष्य विकास साधण्याचेच प्रस्ताव दिले. त्यांनी स्वताच्या हितासाठी कधीच आपली भेट घेतली नाही. आपण त्यांच्या सर्व विकास प्रकल्पांना मान्यता दिली असून डिसेंबर पर्यंत त्यांचा एकही प्रकल्प खंडित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. आमदार श्री. डिसा हे सातत्याने नुवेतील जनतेसाठी कार्यरत राहिले. आत्ता निवडणुकीच्या वेळी नुवेच्या जनतेने त्यांना तेव्हढीच समर्थ साथ दिली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

हॉटेल, शॉपिंग मॉल, रिसॉर्ट आजपासून खुली

Omkar B

शरद पवारांच्या प्रस्तावाने विरोधकांत ‘जान’!

Amit Kulkarni

दुषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाल्याचा संशय

Patil_p

शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर

Amit Kulkarni

फुटिरतेला प्रोत्साहन देण्याचे भाजप सरकारचे धोरण : कामत

Amit Kulkarni

गोवा बागायतदारचे व्यवस्थापक दत्तप्रसाद पटवर्धनना अपघाती मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!