तरुण भारत

पॅरा टेबलटेनिस स्पर्धेत चेतन, रितेश, निलेश, अनुपा, लॉयड, गोपाळ, लिंडन, डॉ. विठ्ठल, रुकी यांना विजेतेपद

क्रीडा प्रतिनिधी /फोंडा

गोवा टेबल टेनिस संघटनेच्या पॅरा टेबलटेनिस समितीने आयोजित केलेल्या दुसऱया जिल्हा पातळीवरील पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत चेतन साळगावकर, रितेश वायंगणकर, निलेश लिंगुडकर, अनुपा पिळगावकर, लॉयड फर्नांडिस, गोपाळ नाईक, लिंडन कार्दोझ, डॉ. विठ्ठल राणे व रुकी अहमद यांनी विजेतेपद पटकावले. पर्वरी येथील संजय स्पेशल स्कूलच्या मनोहर पर्रीकर मेमोरीयल सभागृहात ही स्पर्धा घेण्यात आली. डिसऍबीलीटी राईट्स असोसिएशन ऑफ गोवा, संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, विद्याप्रबोधिनी महाविद्यालय व डॉन बॉस्को ओरेटरी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा स्टँडींग व व्हीलचेअर अशा गटात घेण्यात आली. व्हीलचेअर गटात दोन महिला खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत विविध गटात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकावलेले विजेते पुढीलप्रमाणे-उत्तरगोवा गट अ-चेतन साळगावकर, सचिन गाड, चंद्रकांत गावडे, गट ब-रितेश वायंगणकर, रामकृष्ण गावस, प्रकाश कुंडईकर व विश्राम कशाळकर, गट क-निलेश लिंगुडकर, लिखील कवळेकर, हनी गोलतकर. व्हिलचेअर-मुली-अनुपा पिळगावकर, प्राची ठाकूर, पुरुष-लॉयड फर्नांडिस, विशांत नागवेकर, मौसिक सैय्यद व संतोष मयेकर. दक्षिण गोवा-स्टँडींगगट अ-गोपाळ नाईक, जोजेफ डिसोझा, सुरज नाईक व गोपाळ कुंकळय़ेकर, गट ब-लिंडन कार्दोझ, लक्ष्मीकांत म्हाळगी, विशाल जल्मी, व्हीलचेअर-डॉ. विठ्ठल राणे, मोयजेस रॉड्रीगीस, दुर्गादास गावणेकर व प्रमोद गावडे, गट ब-रुकी अहदम, आगोस्तीनो फर्नांडिस, पॅट्रीक डिसोझ व दुर्गादास नाईक. स्पर्धेचे उद्घाटन वेबचॅनल लाईव्ह न्यूज गोवा डॉट कॉम चे संपादक निरज प्रभू यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उत्तरगोवा अतिरीक्त जिल्हाधिकरी मामू हगे तसेच समाजसेवक अमन लोटलीकर, संजय विशेष स्कूलचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावस्कर, गोवा टेबल टेनिस संघटनेचे सचिव ख्रिस्तोफोर मिनेझीस, विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य भूषण भावे, डिसऍबीलीटी राईट्स असोसिएशनचे अध्यक्ष आवेलीनो डिसा व पॅरा टेबल टेनिस समितीचे अध्यक्ष प्रकाश कामत हे उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

चिखली वास्कोतील श्री नृसिंह सातेरी संस्थानचा नवरात्रोत्सव

Amit Kulkarni

पोलीस प्रशासनात म्हापसा, फोंडा नवे जिल्हे

Omkar B

डिचोली अबकारी खात्यातर्फे सुमारे 4.50 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त.

Omkar B

गोमंतक गौड मराठा समाजातर्फे स्व. यशवंत गावडे यांना आदरांजली

Amit Kulkarni

लॉकडाऊन, कर्फ्यूचा विचार नाहीच

Amit Kulkarni

निदर्शने करणाऱयांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Patil_p
error: Content is protected !!