तरुण भारत

जोगुळभावी येथे बेळगावच्या वृद्धेचे दागिने लांबविले

सौंदत्ती पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

दसरोत्सव असल्याने भाविक मोठय़ा भक्तीभावाने विविध मंदिरांना जाऊन देवदर्शन घेत आहेत. यामुळे मंदिरांमध्ये गर्दी वाढली आहे. त्याचा फायदा चोरटय़ांनी घेतला असून बेळगाव येथील एका वृद्धेचे साडेतीन तोळय़ाचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी जोगुळभावी येथे घडली.

लक्ष्मी महादेव चव्हाण (वय 75 रा. गाडेमार्ग-शहापूर) या आपल्या मुलीबरोबर यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी सौंदत्ती येथे गेल्या होत्या. सौंदत्ती येथे गेल्यानंतर जोगुळभावी येथील मंदिरामध्ये दर्शन घेत असताना लक्ष्मी यांच्या गळय़ातील 25 ग्रॅमचा सोन्याचा पोहे हार आणि 12 गॅमचा अष्टपैलु मणी चोरटय़ाने लांबविला आहे.

या घटनेनंतर लक्ष्मी यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र चोरटय़ांनी तेथून पलायन केले. सुमारे साडेतीन तोळय़ांचे दागिने चोरटय़ांनी पळविले आहे. सौंदत्ती पोलीस स्थानकात त्यांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी सौंदत्ती पोलीस पुढील तपास करीत असून चोरटय़ाला लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गर्दी वाढल्याने चोरटे सक्रिय…

कोरोना नियंत्रणात आल्याने आता मंदिरांमध्येही गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरटे दागिने लांबवत आहेत. रविवारी लक्ष्मी यांच्या गळय़ातील साडेतीन तोळय़ाचे दागिने लांबविण्यात आले तर आणखी एका महिलेच्या गळय़ातील सोन्याचे दागिने लांबविल्याची घटनाही त्याच दिवशी घडली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आता प्रत्येकानेच आपल्या वस्तूंबाबत खबरदारी घ्यावी, अशा प्रतिक्रियाही नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Related Stories

कडोलीच्या अभिजित पाटीलचे के-सेट परीक्षेत यश

Patil_p

ग्रा.पं.अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर

Omkar B

मंगळवारपेठेत जनावरे दगावण्याचा प्रकार सुरूच

Amit Kulkarni

नेहरुनगर येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

Omkar B

हेस्कॉमकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव

Patil_p

गोगटे कुटुंबीयांतर्फे उभारलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!