तरुण भारत

मोटारसायकल चोरटय़ाला अटक

माळमारुती पोलिसांची कारवाई, 11 मोटारसायकली जप्त

बेळगाव : मोटारसायकल चोरटय़ाला माळमारुती पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडील 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन व मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सुमारे 7 लाख रुपये किमतीची ही वाहने आहेत.

Advertisements

या मोटारसायकल चोरटय़ाने बेळगाव शहरासह जिल्हय़ामध्ये विविध ठिकाणी पार्किंग केलेली वाहने चोरली होती. पोलिसांनी सापळा रचून या अट्टल चोराला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 11 वाहने जप्त केली आहेत. माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार, एएसआय ए. बी. कुंडेद, ए. जी. कुरेर, के. डी. नदाफ, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लप्पण्णावर, सी. आय. जेगरी, एस. एम. गडदैगोळ, एल. एम. मुशापुरे यांचा सहभाग होता. या कारवाईनंतर पोलिसांचे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी कौतुक केले.

Related Stories

नियम पायदळी तुडवून लसीकरणासाठी गर्दी

Amit Kulkarni

नक्षत्र कॉलनी येथे 25 लाखाची घरफोडी

Patil_p

बस कर्मचाऱयांच्या संपामुळे परीक्षा पुढे ढकलल्या

Amit Kulkarni

सर्व साहित्य प्रकारांचा अभ्यास करणे आवश्यक

Amit Kulkarni

घरकुलासाठी 50 एकर जमीन ताब्यात घेणार

Patil_p

आविष्कार फौंडेशनचा शिक्षक पुरस्कार चिगुळकर यांना प्रदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!