तरुण भारत

आरटीपीसीआरची सक्ती मागे

जिल्हाधिकाऱयांची माहिती : महाराष्ट्र-गोव्यातून येणाऱया प्रवाशांना मोठा दिलासा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

महाराष्ट्र, गोवा राज्यातून येताना  प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली होती, मात्र आता कोरोना नियंत्रणात आला आहे. बेळगाव जिल्हय़ाबरोबरच महाराष्ट्र आणि गोव्यामध्येही कोरोना नियंत्रणात असल्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातून येणाऱया प्रवाशांना सक्तीची असलेली आरटीपीसीआर चाचणी रद्द करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव जिल्हय़ातील जनतेला दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये तर अधिक होती. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातून येणाऱयांसाठी आरटीपीसीआर चाचणी ही सक्तीची करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना प्रवास करणे अवघड जात होते. आरटीपीसीआर चाचणीचा भुर्दंडही बसत होता. तर या चाचणीची भितीही मनात होती. मात्र आता ही चाचणी रद्द करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर वसलेला आहे. व्यवसाय आणि उद्योगासाठी सीमाभागातील जनता महाराष्ट्रात आणि गोव्यात जाते, तर त्या राज्यातीलही जनता बेळगाव जिल्हय़ामध्ये येत असते. या दोन्ही राज्यांचा संपर्क अत्यंत जवळचा आहे. मात्र कोरोनाच्या फैलावामुळे बरेच निर्बंध घालण्यात आले होते. महाराष्ट्रातून तसेच गोव्यातून येणाऱया व्यक्तीला आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमाभागातील आणि बेळगावातील जनतेला त्रास झाला होता. ही सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी होत होती.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. केवळ पाच ते 10 रुग्ण आढळत आहेत. बेळगाव जिल्हय़ाबरोबरच महाराष्ट्रातही कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सरकारच्या आदेशानुसार ही सक्ती मागे घेतली आहे. बॅरिकेड्स लावून अडविण्यात आलेले सीमाभागातील रस्ते आता खुले होणार आहेत. यामुळे निपाणी, चिकोडी, अथणी, हुक्केरी या तालुक्मयांतील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या दसरोत्सव असल्याने देवदर्शनासाठी कर्नाटकातील जनता महाराष्ट्रात जात आहे, तर महाराष्ट्रातील जनता कर्नाटकात येत आहे. त्यांनाही आता सोयीचे ठरणार आहे. जिल्हाधिकाऱयांच्या या आदेशानंतर त्यांचे स्वागत होत आहे. कोरोना लसीकरणाची मोहीम जोरदारपणे राबविण्यात आली. बेळगाव जिह्यातील 97 टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाचा टक्काही घटला आहे. त्यामुळे आता विविध निर्बंध हटविण्यात येत आहेत.

सध्या दसरोत्सव सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. परराज्यातून येणाऱया प्रवाशांची गैरसोय होत होती. कारण कोगनोळी चेकपोस्टवर महाराष्ट्रातून येणाऱया नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत होती. बऱयाच जणांना माघारी फिरावे लागत होते. तर काहीजण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. यामुळे भितीचे वातावरण होते. रुग्णसंख्या कमी झाली आहे. असे असले तरी अजून कोरोना पूर्णपणे गेला नाही. मात्र आता संख्या घटली असल्याने जिल्हाधिकाऱयांनी आरटीपीसीआर सक्ती रद्द केली आहे. त्यामुळे वाहतूक तसेच प्रवाशांची संख्या वाढणार आहे.

नवे पॉझिटिव्ह 10 आणि 10 रुग्ण कोरोनामुक्त

बेळगाव जिह्यामध्ये मंगळवारी नवे कोरोना पॉझिटिव्ह 10 रुग्ण आढळले आहेत तर 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाचाही मृत्यू झाला नाही. सध्या 94 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. बेळगाव तालुक्मयात 7, बैलहोंगल 1, चिकोडी 1 व इतर 1 असे एकूण 10 रुग्ण आढळले असून अथणी, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती या तालुक्मयांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही.

Related Stories

रेशन दुकानदारांचे 1 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन

Patil_p

तंत्रज्ञानाच्या आहारी जाता कामा नये

Amit Kulkarni

बेळगावसह पाच जिल्हय़ांत आजपासून लसीची ‘ड्राय रन’

Patil_p

शांताईतर्फे शंकर पाटील यांचा सत्कार

Amit Kulkarni

आदर्श सोसायटीच्या खानापूर शाखेचे स्वतःच्या जागेत स्थलांतर

Omkar B

ऐन सणातच शहरात पाणीटंचाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!