तरुण भारत

पाकच्या दहशतवाद्याचा चौकशीत मोठा खुलासा; म्हणाला…

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीत अटक केलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अशरफ हा गेल्या काही वर्षांत देशातील दहशतवादी घटनांमध्ये सामील आहे. दिल्ली उच्च न्यायालयासमोर 2011 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अशरफचा सहभाग आहे. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात अनेकदा रेकी केली होती. पूर्व दिल्लीहून तो दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाला होता. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्यासमोर अनेक लष्करी जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा खुलासाही त्याने चौकशीत केला आहे. काही काळ या जवानांना ओलिस ठेवल्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचेही त्याने सांगितले.

Advertisements

विशेष कक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानात बसलेल्या अशरफचा हँडलर नासिर त्याला सूचना देत असे. त्यानुसार तो जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांना भेटत असे. हँडलर नासिरच्या सांगण्यावरूनच तो जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे. लष्कराचे व्हिडिओ बनवत आणि गोपनिय माहिती दहशतवाद्यांना पुरवत होता. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले झाले.

अशरफने चौकशीत खुलासा केला आहे की, हँडलरने सोमवारी त्याला व्हॉट्सऍपवर पाकिस्तानमधून मेसेज पाठवले होते की, शस्त्राचा माल आला आहे. त्याने शस्त्रास्त्रांच्या मालापर्यंत पोहोचून ते दुसऱया ठिकाणी नेले पाहिजे. मात्र, लक्ष्मीनगर येथून दहशतवादी घराबाहेर पडताच इन्स्पेक्टर विनोद बडोला, इन्स्पेक्टर रवींद्र त्यागी, एसआय यशपाल भाटिया सुंदर गौतम यांच्या पथकाने मंगळवारी त्याला अटक केली.

Related Stories

भारत अमेरिकेकडून खरेदी करणार 30 ‘MQ-9B’ गार्डियन ड्रोन

datta jadhav

…तर मोदींच्या या ‘विकासा’ला आता सुट्टी देण्याची गरज

triratna

कोल्हापूर जिह्यात 30 हजार नवमतदार

triratna

महाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल – नाना पटोले

triratna

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यांतर्गत उत्तर प्रदेशात पहिली तक्रार दाखल

Patil_p

कोरोना संकटात बिहारमध्ये रणधुमाळी

Patil_p
error: Content is protected !!