तरुण भारत

काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकुनिया गावात झालेल्या हिंसाचाराबद्दल चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन हे शिष्टमंडळ लाखीमपूर खेरी हिंसाचाराच्या वस्तुस्थितीबाबत राष्ट्रपतींना निवेदन सादर करणार आहे.

Advertisements

या शिष्टमंडळातील सात सदस्यांमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, ए.के. अँटनी, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. काँग्रेसने १० ऑक्टोबर रोजीच पक्षाच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाच्या भेटीसाठी परवानगी मागितली होती. त्याला मंगळवारी राष्ट्रपतींची मान्यता मिळाली. त्यानुसार आज हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.

Related Stories

अमेरिकेच्या सीआयएचा अधिकारी हवाना सिंड्रोमचा भारतातला पहिला रुग्ण

triratna

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, पुढील 4 दिवस अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा इशारा

Rohan_P

कोरोनामुक्तांना 9 महिन्यांनी मिळावी लस

Patil_p

‘निर्भया’तील दोषीकडून पुन्हा याचिका दाखल

Patil_p

‘लस उत्सव’ हे कोरोना विरोधात दुसरे ‘युद्ध’

Patil_p

उत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या

prashant_c
error: Content is protected !!